घरमुंबईमलेरिया पॅरासाईट तपासणीच्या किटबाबत अक्षम्य दुर्लक्ष

मलेरिया पॅरासाईट तपासणीच्या किटबाबत अक्षम्य दुर्लक्ष

Subscribe

आता मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या या किटची तपासणी राष्ट्रीय जैविक संस्थांकडून होत नसल्याचं समोर येत आहे.

मलेरियाच्या पॅरासाईट तपासणी किटचा दर्जा सरकारी राष्ट्रीय जैविक संस्थांकडून मान्यताप्राप्त नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. यावरुन जवळपास वर्षभर सुरू असलेल्या मलेरिया साथीत सापडलेल्या रूग्णांच्या जिवाशी खेळ सुरू असल्याचं स्पष्ट होत आहे. यातून आरोग्याबाबत डॉक्टर, पॅथॉलॉजिस्ट सारखे कोणतेही घटक सजग नसल्याचंही बोललं जात आहे.

किट तपासणी प्रक्रियेत दुर्लक्ष

यापूर्वीही अनेकदा मलेरिया किटच्या संवेदनशीलतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं होता. पण, आता मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या या किटची तपासणी राष्ट्रीय जैविक संस्थांकडून होत नसल्याचं समोर येत आहे. मलेरिया पॅरासाईट टेस्ट करणारी उपकरणे एमएबीएल लॅबमध्येच तपासली जातात. ही लॅब सरकारमान्य असते. ब्लड सॅम्पल या उपकरणात घालून त्या किटचा दर्जा पाहिला जातो. या किट उपकरणाचा दर्जा, मापदंड आणि त्यातील संवेदनशीलता राष्ट्रीय जैविक संस्थेकडूनच दिला जातो. त्यानंतरच ते किट मान्यता प्राप्त होते. पण, या किटचा दर्जा तपासण्याचे काम सर्रास कोणत्याही मलेरिया संसर्गित रक्ताद्वारे केले जाते. किटचा दर्जा तपासण्यासाठी लागणारे मलेरिया संसर्गित रक्त देखील राष्ट्रीय जैविक संस्थांकडूनच दिले जाते. पण, कोणत्याही किट निर्मिती करणाऱ्या कंपनीकडून राष्ट्रीय जैविक संस्थांकडे तशी मागणी केलेली दिसून येत नाही.

- Advertisement -

मलेरिया पॅरासाईट प्रमाण तपासणी समान नाही

कोणत्या रक्तातून मलेरियाचे किती प्रमाणात पॅरासाईट आढळून आले? या पॅरासाईटचे प्रमाण सध्याच्या कोणत्याही किटमधून समान आढळून येत नाहीत. एकात २०० आले तर दुसऱ्या किटमध्ये ३०० पॅरासाईट देखील आढळून येऊ शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. याविषयी अधिक माहिती देताना ऑल फूड अँड ड्रग्ज लायसन्स होल्डर फाऊंडेशनचे अध्यक्ष अभय पांडे यांनी सांगितले की, “हे रूग्णांसाठी भयंकर असून राष्ट्रीय जैविक संस्थांकडून कोणकोणत्या कंपन्यांनी कधी कधी मलेरिया नमुने घेतल्याची तपासणी व्हावी. तसेच संस्थेकडून जर नमुने घेतले नसल्यास कोणत्या नमुन्यांवर किट तपासणी झाली असावी, याची चौकशी व्हावी. त्या कंपन्यांवर कारवाई व्हावी.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -