घरमुंबईप्रेमसंबंध उघड करण्याची धमकी देणारा तरुण अटकेत

प्रेमसंबंध उघड करण्याची धमकी देणारा तरुण अटकेत

Subscribe

प्रेमसंबंध उघड करण्याची धमकी देऊन तरुणीवर बलात्कार करणाऱ्या तरुणाला बोरीवली पोलिसांनी अटक केली असून या तरुणाला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

प्रेमसंबंध उघड करण्याची धमकी देऊन एका २३ वर्षांच्या तरुणीवर बलात्कार करणाऱ्या तरुणाला बोरीवली पोलिसांनी अटक केली आहे. प्रथमेश कृष्णा शिर्के असे या तरुणाचे नाव असून या तरुणाला सोमवारी बोरीवली पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याला बोरीवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक चौकशी करत आहेत.

नेमके काय घडले?

पिडीत तरुणी ही बोरीवली परिसरात तिच्या कुटुंबियांसोबत राहते. तिचे वैभव नावाच्या एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधाची माहिती प्रथमेश शिर्के याला समजली होती. त्यामुळे तो पिडीत तरुणीला ब्लॅकमेल करीत होता. त्यांच्यातील प्रेमसंबंध उघड करुन तिची बदनामी करण्याची धमकी तो तिला देत होता. या धमकीनंतर त्याने तिच्यावर लैगिंक अत्याचार केला होता. त्याच्याकडून सतत सुरु असलेल्या शोषणाला कंटाळून तिने हा प्रकार तिच्या पालकांना सांगितला होता. या माहितीने तिच्या पालकांना प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यानंतर तिने बोरीवली पोलीस ठाण्यात प्रथमेश शिर्केविरुद्ध लेखी अर्जाद्वारे तक्रार केली.

- Advertisement -

या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर दोन दिवसांपूर्वी त्याच्याविरुद्ध पोलिसांनी बलात्कारासह जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला करत आरोपी प्रथमेश शिर्के याला सोमवारी पोलिसांनी अटक केली आहे. याच गुन्ह्यांखाली तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. तपासात पिडीत तरुणी आणि आरोपी एकमेकांच्या परिचित असून तो तिला तिचे प्रेमसंबंध उघड करुन तिची बदनामी धमकी देत असल्याचे चौकशी दरम्यान उघडकीस आले आहे.


वाचा – भिवंडीत पेपरफुटी प्रकरणी चौथा शिक्षक अटकेत

- Advertisement -

वाचा – व्यसनापायी आईचे दागिने चोरणारा अटकेत


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -