बसमध्ये अल्पवयीन मुलावर चाकूने हल्ला

दारू पिताना हटकले म्हणून एका अल्पवयीन मुलावर चाकू हल्ला झाला आहे. उल्हासनगरमध्ये ही घटना घडली.

Mumbai
knife attack
चाकू हल्ला

बसमध्ये दारू पिऊ नको म्हणून समजविण्यास गेलेल्या एका अल्पवयीन मुलावर अज्ञात इसमाने चाकूने वार केले. या हल्ल्यात हा मुलगा गंभीररित्या जखमी झाला आहे. त्याला उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे .

उल्हासनगर – ३ येथे सपना गार्डन परिसरात अंकित सिंग ( १५ ) हा अल्पवयीन मुलगा त्याच्या नातेवाईकासह राहतो. काल सोमवारी रात्री १० वाजताच्या सुमारास ऑर्डनन्स फॅक्टरी गेट जवळ बसमध्ये चढला, यावेळी एक अज्ञात इसम दारू पीत असल्याचे त्याने पहिले. त्याने या इसमाला बस मध्ये दारू पिऊ नका असे समजविण्याचा प्रयत्न केला मात्र यामुळे संतप्त झालेल्या त्या इसमाने त्याच्याकडील चाकूने डोक्यात व हातावर वार केले. या हल्ल्यात अंकित गंभीररित्या जखमी झाला असून त्याला  मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अंबरनाथ पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात इसमाच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या संदर्भात आरोपीचा शोध व अधिक तपास पोलीस करीत आहेत .