घरगणपती उत्सव बातम्याGanesh Visarjan: कृत्रिम तलाव स्वच्छ करत असताना कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू

Ganesh Visarjan: कृत्रिम तलाव स्वच्छ करत असताना कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू

Subscribe

मरण पावलेला गणेश जैन हा भंगारचा व्यवसाय करायचा त्याला दोन मुले आहेत. या घटनेमुळे त्याच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगरच कोसळला आहे.

कृत्रिम गणेश विसर्जन तलावाचे पाणी बदलताना विजेचा शॉक लागून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना शुक्रवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घाटकोपरच्या असल्फा गाव येथे घडली. या प्रकरणी सकिनाका पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून तपास सुरू आहे. गणेश जैन असे दुर्देवी तरुणाचे नाव आहे. गणेश जैन हा विवाहित असून त्याला दोन मुले आहेत. घाटकोपर असल्फा गाव, दत्त नगर येथे राहणारा गणेश जैन याचा भंगारचा व्यवसाय होता. दत्त नगर येथे मुंबई महानगर पालिकेकडून गणेश विसर्जनासाठी (Ganesh Visarjan)  कृत्रिम तलाव बांधण्यात आला होता. या कृत्रिम तलावाची साफसफाई पाणी बदलने यासाठीचे कंत्राट एका खासगी व्यक्तीला देण्यात आलेले होते.

गुरुवारी गौरी गणपतीचे विसर्जन सुरळीत पार पडले. त्यानंतर कृत्रिम तलावाची साफसफाई करून पहाटे पाणी बदलण्यात आलेले होते. दरम्यान शुक्रवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास गणेश जैन हा स्थानिक कार्यकर्ता तलावा जवळ आला. तलावात कचरा साचल्यामुळे त्याने तलावाचे पाणी बदलण्यासाठी पाण्याचा विजेवरील मोटारपंप सुरू केला. मात्र यावेळी शॉक लागून त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती स्थानिक नगरसेवक प्रकाश मोरे यांनी दिली.

- Advertisement -

सध्या हा तलाव बंद करण्यात आलेला असून या तलावातील सर्व गणेश मुर्त्या एकत्र करण्यात आलेल्या असून या सर्व गणेश मुर्त्या कुर्ला येथील शीतल तलावात विसर्जन करण्यात येणार असल्याची माहिती नगरसेवक मोरे यांनी दिली. मुंबई महानगरपालिकेने या कृत्रिम तलावाचे कंत्राट खासगी व्यक्तीला देण्यात आलेले असून कंत्राटदाराने वेळीच काळजी घेतली असती तर ही घटना घडली नसती असे प्रकाश मोरे यांनी म्हटले आहे. या प्रकरणी सकिनाका पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून तपासात या दुर्घटनेत दोषी आढळणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती साकिनाका पोलिसांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -