घरमुंबईबेरोजगार मुलाने केली आईची हत्या, भाईंदरमध्ये खळबळ

बेरोजगार मुलाने केली आईची हत्या, भाईंदरमध्ये खळबळ

Subscribe

कामाला जात नसल्यामुळे मुलाशी वाद घालणाऱ्या आईला आपला जीव गमवावा लागला आहे. या माथेफिरू मुलाने आईला बेदम मारहाण केल्यामुळे तिचा मृत्यू झाला आहे.

मुलागा कामाला जात नाही म्हणून त्याची चिंता वाटणाऱ्या आईला आपले प्राण गमावावे लागले आहेत. भाईंदरमध्ये एका माथेफिरू मुलाने आपल्या आईला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेत या आईचा मृत्यू झाला आहे. मागील काही महिन्यांपासून हा माथेफिरू मुलगा बेरोजगार होता. बेरोजगार असल्यामुळे आरोपी मुलगा मानसिक तणावात असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. दरम्यान या माथेफिरू मुलाला भाईंदर पोलिसांनी अटक केली आहे. या मुलावर खूनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दरम्यान या घनटनेमुळे परिसरातील लोकांमध्ये भितीचे वातावरण आहे.

घटनेबद्दल अधिक माहिती

भाईंदर पश्चिमेकडील मांडवी तलावाच्या शेजारी प्रतीक्षा बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या ४५ वर्षीय मुलाने खून केला आहे. सोमनाथ मित्रा असे या अरोपी मुलाचे नाव आहे. सोमनाथने आपली आई रमा (८५) यांचा खून केला आहे. कामाला जात नाही म्हणून आईला या मुलाची चिंता होती. मागील काही वर्षांपासून हे दोघे या इमारतीत भाड्याने राहत होते. घरात आर्थिक अडचन होती यासाठी मयत आई आपल्या मुलाला कामाला जाण्याचा सल्ला देत होती. या कारणावरून आई आणि मुलाचे वाद होत होते. काल या दोघांमध्ये झालेल्या वादामध्ये सोमनाथने आपल्या आईला बेदम मारहाण केली होती. या मारहाणीमध्ये आईचा मृत्यू झाला. आईचा खून करून सोमनाथ रक्ताळलेल्या हाताने खिडकीत बसला होता. खिडकीत तो स्वतःशीच बोलत बसला. इमारतीतील लोकांना त्याची भिती वाटल्यामुळे त्यांनी ही माहिती पोलिसांनी दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन सोमनाथला ताब्यात घेतले. सोमनाथ मानसिक रोगी असल्याचा संक्षय पोलिसांना आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -