घरमुंबईपत्नीच्या मृतदेहाशेजारी पतीने काढले दोन दिवस

पत्नीच्या मृतदेहाशेजारी पतीने काढले दोन दिवस

Subscribe

पत्नीची हत्या करून दोन दिवस तिच्या मृतदेहाजवळ काढून अखेरीस त्याने स्वतःही आत्महत्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना सायन प्रतीक्षा नगर येथे घडली आहे.

पत्नीची हत्या करून दोन दिवस तिच्या मृतदेहाजवळ काढून अखेरीस त्याने स्वतःही आत्महत्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना सायन प्रतीक्षा नगर येथे घडल्याचे उघडकीस आले आहे. वडाळा ट्रक टर्मिनस पोलिसांनी जखमी पतीला उपचारासाठी सायन रुग्णालयात दाखल केले असून महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह शवविच्छेदनासाठी सायन रुग्णालय येथे पाठवण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी पत्नीच्या हत्येप्रकरणी पती विरोधात गुन्हा दाखल केला असून पतीला अटक करण्यात आली आहे.

नेमके काय घडले?

संजयकुमार पडीहारी (२९) असे अटक करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. संजयकुमार याचे वर्षभरापूर्वीच सुमन (२५) हिच्यासोबत विवाह झाला होता. सायन प्रतीक्षा नगर येथील शास्त्री नगर या ठिकाणी भाडेतत्वावर संजय हा पत्नीला घेऊन राहत होता. एका गारमेंट शॉपमध्ये नोकरी  करणारा संजयकुमारला दारूचे भयंकर व्यसन होते. या व्यसनामुळे पतीपत्नीत सतत भांडणे होत होती. दारू पिण्यास पत्नी पतीला सतत विरोध करीत असल्यसामुळे तो नेहमीच तिला मारहाण करायचा. मंगळवारी सायंकाळी संजय कुमार याच्या घरातून अचानक दुर्गंधी येऊ लागली. दुर्गंधी येत असल्यामुळे शेजाऱ्यांनी वडाळा ट्रक टर्मिनस पोलिसांना त्याबाबत माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी संजयकुमार पडीहारी यांने आतून बंद असलेले दार तोडून पोलिसांनी आत प्रवेश केला. पोलिसांना ते दृश्य पाहून धक्काच बसला. संजयकुमार हा मृत पत्नीच्या अंगावर हात टाकून बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. तसेच पत्नी सुमनच्या मृतदेह अर्धवट कुजलेल्या अवस्थेत आढळला. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी दोघांना सायन रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी सुमनला मृत घोषित करून संजयकुमार याला उपचारासाठी दाखल करून घेतले.

- Advertisement -

शवविच्छेदन अहवालात सुमनची हत्या मारहाणीमुळे झाल्याचे उघडकीस आले असून पोलिसांनी याप्रकरणी पती संजय कुमार याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला शुक्रवारी रुग्णालयातून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडे चौकशी केली असता दोघात झालेल्या भांडणात त्याने पत्नी सुमनचे डोके जमिनीवर आदळून हत्या केली. त्यानंतर दोन दिवस तिच्या मृतदेहासोबत काढले आणि केलेल्या कृत्याचा पश्याताप झाल्याने त्यानेही स्वतःच्या हाताच्या नसा कापून आत्महत्येचा प्रयत्न केला, अशी माहिती त्याने पोलिसांना दिली आहे.


वाचा – पत्नीच्या हत्येनंतर पतीने केला आत्महत्येचा प्रयत्न

- Advertisement -

वाचा – पुण्यात पत्नीचा खून करणारा गजाआड


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -