घरमुंबईबापरे! एक वाइन बॉटल पडली सव्वा लाखाला

बापरे! एक वाइन बॉटल पडली सव्वा लाखाला

Subscribe

एका व्यक्तीने फोनवर वाइनची बॉटल मागवली होती. वाइन खरेदीसाठी त्या व्यक्तीने जो व्यव्हार केला त्यात त्याला एका इसमाने सव्वा लाख रुपयांचा गंडा घातल्याचे उघड झाले आहे.

फोनवरुन वाइनची ऑर्डर देणे एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले आहे. या व्यक्तीने वाइनची एक बॉटल ऑनलाइन मागवली होती. मात्र या व्यक्तीची सव्वा लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. ही घटना शनिवारी १२ ऑक्टोबर रोजी घडली. या घटनेप्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ज्या व्यक्तीला लुबाळले ती व्यक्ती एका मोबाईल सर्व्हिस स्टोअरचा अधिकारी आहे. पोलीस या घटनेप्रकरणी तपास घेत आहेत. याशिवाय ज्या वाइन शॉपच्या नावाने ग्राहकाला लुबाळले गेले आहे त्या वाइन शॉपच्या दुकानदाराने आपल्या नावाचा दुरोपयोग केला जात असल्याचे स्पष्ट केले आहे. याशिवाय वाइन शॉप मालकाने देखील याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

काय आहे नेमके प्रकरण?

एका व्यक्तीने रात्री एक वाइन ऑर्डर करण्यासाठी इंटरनेटवर जवळच्या वाइन शॉपचा पत्ता चेक केला. तेव्हा अंधेरी (पूर्व) येथील उज्वल वाइन्सचा फोन नंबर मिळला. तेव्हा या ग्राहकाने त्या फोननंबरवर कॉल केला आणि एका वाइन बॉटलची ऑर्डर दिली. मात्र, आर्डर देतांना समोरुन आम्ही कॅश ऑन डिलिव्हरी बंद केल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर समोरच्या व्यक्तीने ग्राहकाची क्रेडिट कार्डची माहिती घेतली. यानंतर त्याने ओटीपी मागितला. लुबाडणाऱ्या व्यक्तीचे शब्दांमध्ये गुंतून ग्राहकाने ओटीपी कोड दिला. त्यानंतर १०.२० आणि ११.१५ वाजेच्या सुमारास ग्राहकाच्या खात्यातून गैरव्यव्हार करण्यात आला. सुरुवातीला क्रेडिट कार्डमधून ३१ हजार ७७७ रुपयांचा व्यव्हार काढण्यात आला. हे पैसे चुकून काढण्यात आल्याचे त्याने सांगितले. मात्र, ११.१५ वाजेच्या सुमारास तब्बल ६१ हजार रुपये काढण्यात आले. अखेर ग्राहकाने कार्ड ब्लॉक करुन बँकेकडे तक्रार केली.

- Advertisement -

हेही वाचा – चाकणमध्ये कुख्यात नक्षलवाद्याला अटक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -