घरCORONA UPDATECorona: नायर हॉस्पिटमधील रुग्णाची कोरोनाच्या भीतीने आत्महत्या

Corona: नायर हॉस्पिटमधील रुग्णाची कोरोनाच्या भीतीने आत्महत्या

Subscribe

मुंबईतील नायर हॉस्पिटलमध्ये ४३ वर्षीय रुग्णाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या रुग्णाने स्वच्छतागृहात गळफास लावून आत्महत्या केल्याचे आढळून आले. हा प्रकार गुरुवारी सकाळी घडला. या रुग्णाची कोरोना चाचणी करण्यात आली होती. मात्र त्याचा चाचणी अहवाल अद्याप आलेला नाही. परंतू त्यापूर्वी त्याने कोरोनाच्या भीतीने आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. माहिम कोळीवाडा येथील हा रुग्ण २१ मे रोजी नायर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाला होता. त्याला ताप आणि सर्दी होती. त्याची पहिली कोविड – १९ चाचणी ही निगेटिव्ह आली होती. मात्र बुधवारी पुन्हा त्या रुग्णाचे स्वॅब चाचणीसाठी घेण्यात आले.

हेही वाचा – चीनला हरवण्यासाठी चीनच्या वस्तूंवर बहिष्कार घालणे आवश्यक – बाबा रामदेव

- Advertisement -

पंख्याला गळफास लावून आत्महत्या

या प्रकरणी आग्रीपाडा पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी माहिती दिली की, बुधवारी सकाळी रुग्ण स्वच्छतागृहात गेला. खुप तो परत न आल्याने हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांनी स्वच्छतागृहाजवळ येऊन त्याला आवाज दिला. त्याच्याकडून प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी बाथरूमचा दरवाजा तोडला. दार उघडताच रुग्णाचा मृतदेह पंख्याला लटकलेला आढळून आला. आम्हाला अद्याप कोणतीही सुसाईड नोट सापडली नसून आत्महत्येचे कोणतेही ठोस कारण समोर आलेले नाही. आम्ही अपघाती मृत्यूची नोंद केली असून या प्रकरणी तपास सुरू केला आहे, अशी माहिती आग्रीपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी एस. आगावणे यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -