फडणवीसांवर मंगेशकर कुटुंब नाराज,हृदयनाथ मंगेशकरांनी बोलून दाखवली नाराजी

Mumbai
Hridaynath Mangeshkar

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना काही दिवसांपूर्वी रूग्णालयात दाखल केले होते. त्यांची प्रकृती गंभीर होती. मात्र तत्कालीन मुख्यमंत्री भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि मंत्री विनोद तावडे लता मंगेशकरांना भेटायला आले नाहीत, अशी खंत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी व्यक्त केली. कर्जत मध्ये हृदयनाथ मंगेशकरांचा कार्यक्रम झाला त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रम हवा असल्यास नेतेमंडळी अनेकदा भेटतात, पोन करतात, मात्र दीदी आजारी होती त्यावेळी तात्कालीन मुख्यमंत्री फडणवीस आणि विनोद तावडे भेटायलाही आले नाहीत अशी नाराजी मंगेशकरांनी व्यक्त केली.
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याच्या आदल्या दिवशी लतादीदी यांची भेट घेऊन आर्शीवाद घेतले हे देखील सांगितले. त्याचप्रमाणे मंगेशकर कुटूंबीयांचे जवळचे स्नेहसंबंध ठाकरे कुटूंबीयांशी आहेत असे हृदयनाथ मंगेशकर पुढे म्हणाले.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या सहवासात मी २२ वर्षे होतो. छत्रपती शिवाजी महाराज हे सावरकरांचे प्रेरणास्थान होते. या स्वातंत्र्यवीर सावरकरांवर काँग्रेसकडून टीका होत असल्यामुळे त्यांनी खंत व्यक्त केली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here