घरमुंबईमनोज कोटक यांच्या विजयाची पाच कारणे

मनोज कोटक यांच्या विजयाची पाच कारणे

Subscribe

मनोज कोटक यांचा विजय

  • लोकसभा निवडणुकीत यंदा ईशान्य मुंबईमध्ये मतदानाचा टक्क्यात वाढ झाली होती. त्याचा परिणाम मनोज कोटक यांच्या विजयामध्ये दिसून आला.
  • मुलुंड, घाटकोपर या विधानसभा क्षेत्रातील गुजराती बहुल समाजाप्रमाणे विक्रोळी, भांडुप या मराठी बहुल मतदारसंघातून यावर्षी मोठ्या प्रमाणात मतदान करण्यात आले. वाढलेल्या मतदानामुळे कोटक यांचा विजय झाल्याचे बोलले जात आहे.
  • शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे कोटक यांच्या मार्ग सुकर झाला. ईशान्य मुंबई मतदार संघांतून किरीट सोमय्या यांना उमेदवारी देण्यास विरोध केल्याने कोटक यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे कोटक यांना विजयी करण्यासाठी शिवसेनेने कंबर कसली होती. शिवसेनेचे कार्यकर्ते कोटक यांच्या प्रचारासाठी रस्त्यावर उतरले होते. त्यामुळेच कोटक यांना मराठीबहुल भागातूनही मोठ्या प्रमाणात मतदान झाल्याचे दिसून आले.
  • राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय दिना पाटील यांचा अति आत्मविश्वास त्यांना नडल्याचे मतदारसंघात बोलले जात आहे. मनोज कोटक हे लोकसभा निवडणुकीसाठी नवखे असल्याने व त्यांच्या तुलनेत आपल्याला अनुभव अधिक असल्याने कोटक यांचा पराभव नक्की होणार असा आत्मविश्वास संजय पाटील यांना होता. त्यामुळे त्यांनी कोटक यांनी दुय्यम लेखत त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. परिणामी त्यांनी प्रचार कमी केल्याने त्याचा फटका त्यांना निवडणुकीत सहन करावा लागला.
  • मनोज कोटक यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी वृद्धांपासून यावेळी प्रथमच मतदान करणार्‍या प्रत्येक उमेदवारापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी सकाळी सहा वाजता उठून त्यांनी पार्कमध्ये प्रभात फेरीमध्ये जाणार्‍या वृद्ध नागरिकांची भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -