मुंबई लोकलमध्ये गर्दुल्ला गुटखा खाऊन मुलीच्या अंगावर थुंकला 

ही घटना रात्री १०.३० मिनिटांनी घडली असून यावेळी तिने त्या गर्दुल्याला पकडण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र या गर्दुल्याने या तरूणीच्या तावडीतून पळ काढला

Vashi

मुंबईचे लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये किळस आणणारा प्रकार घडला आहे. नेरूळ येथे राहणारी रुणाली पाटील ही तरूणी शुक्रवारी वाशीहून पनवेलची लोकल पकडत असताना एक गर्दुला गुटखा खाऊन अक्षरशः तिच्या अंगावर त्याने गुटख्याच्या पिचकाऱ्या मारल्या. ही घटना रात्री १०.३० मिनिटांनी घडली असून यावेळी तिने त्या गर्दुल्याला पकडण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र या गर्दुल्याने या तरूणीच्या तावडीतून पळ काढण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाला आहे.

या किळसवाण्या आणि संतापजनक वागणुकीचा या तरूणीने फेसबुकवर पोस्ट लिहित या घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे.

आज माझ्यासोबत घाणेरडा प्रकार घडला, उद्या तुमच्या आई बहिणी सोबत असं घडू नये असं वाटत असेल तर please हा विडिओ share करा…

Runali Patil ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಶುಕ್ರವಾರ, ಆಗಸ್ಟ್ 23, 2019

अशी घडली घटना

तरुणी वाशीहून पनवेलकडे जाण्यास निघाली. गर्दुल्ला वाशीच्या दुसऱ्या प्लॅटफॉर्मवरील लोकलमध्ये चढला गर्दुल्ल्याने तरुणीच्या पाठीमागून येत तिच्या अंगावर गुटखा थुंकला. यावेळी लोकल सानपाडा स्टेशनला आली होती. त्यावेळी तरुणीने आरडाओरडा करून त्या गर्दुल्ल्याला पकडा, अशी विनंती इतर प्रवाशांना केली. काही लोकांनी त्याला पकडून चांगलाच मार दिला आहे. मात्र, हा माणूस प्रवाशांच्या कचाट्यातून निसटला.

या संपुर्ण घडलेल्या घटनेचे वर्णन पिडीत तरूणीने सोशल मीडियावर व्हिडिओ करून शेअर केले आहे. तसेच, ‘आज माझ्यासोबत घाणेरडा प्रकार घडला. उद्या तुमच्या आई-बहिणीसोबत असं घडू नये, असं वाटत असेल तर प्लीज हा व्हिडीओ शेअर करा. आवाज उठवायला हवा नाही तर स्त्री माता नाही कचऱ्याची पेटी होईल. अशा विकृत माणसांच्या विरोधात आवाज उठवलाच पाहिजे,’ असे ही तरूणी या व्हिडिओमध्ये बोलताना दिसत आहे.