घरमुंबईमराठी क्रांती मोर्चा लोकसभेच्या रिंगणात

मराठी क्रांती मोर्चा लोकसभेच्या रिंगणात

Subscribe

आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा क्रांती मोर्चादेखील निवडणूक मैदानात उतरणार आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन तशी घोषणा केली आहे.

आगामी लोकसभा निवडणूकीच्या रिंगणात आता मराठा क्रांती मोर्चा देखील निवडणूक मैदानात उतरणार आहे. मराठा समाजाच्या विविध मागण्यांची पूर्तता भाजप सरकारने केलेली नाही. त्यामुळे आता आम्ही कमळवर बहिष्कार घालून स्वत: निवडणूक लढवणार असे मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकारी म्हटले आहेत. मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसवर नाराजा व्यक्ती केली. भाजप सरकारच्या अगोदरच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनेही मराठा समाजावर अनयायच केला, असे मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी म्हणाले.

‘मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांच्या पायाशी जाणार नाही’

आता मराठा समाजाच्या मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांजवळ जाणार नाही असा निर्धार मराठा क्रांती मोर्चाने घेतला आहे. ‘मराठा समाजाने आपल्या विविध मागण्यांसाठी ५८ मुक मोर्चे काढली. मुंबई आणि नागपुरात तर राजव्यापी मोर्चे काढले. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ती आश्वासनं पूर्ण कराण्याचे आश्वासने दिली. परंतु, दीड वर्षे पूर्ण होऊनही आश्वासनांची पूर्तता झालेली नाही. मराठा आरक्षणाचा विषय म्हणायाचा तर तो न्यायप्रविष्ट आहे. त्याचबरोबर कोपर्डी हत्याकांडातील नराधमांनाही शिक्षा दिलेली नाही. तिच्या मारेकऱ्यांना फासावर लटकवू असे सांगण्यात आले होते. त्यामुळे आता कुठल्याही मांगण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या पायाशी जाणार नाही’, असे मराठा क्रांती मोर्चाचे प्रतिनिधी विनोद पोखरकर म्हणाले आहेत.

- Advertisement -

मराठा समाजाला काहीही मिळालेलं नाही

मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की, मराठा समाजाच्या आंदोलनात अनेक तुरुणांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं. परंतु, तरिही मराठा समाजाला काहीही मिळालेलं नाही. सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ओरडून सांगत आहेत की, आम्ही मराठा समाजाल आरक्षण दिलं. परंतु मराठा समाजाला काहीही मिळालेलं नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -