घरमुंबईमराठा क्रांती मोर्चा भाजपला धडा शिकवणार!

मराठा क्रांती मोर्चा भाजपला धडा शिकवणार!

Subscribe

मराठा सामाजाने आपल्या समुदायाच्या प्रश्नांवरून राज्यव्यापी मोर्चा नागपुरात काढला. तसेच राज्यभरात ५८ मोर्चे काढले. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी जी आश्वासने दिली होती त्यांना आज दीड वर्षे पूर्ण होत आहेत. त्यातील एकाही आश्वासनाची पूर्तता अद्याप झालेली नाही. मराठा आरक्षणाचा विषय न्यायालयात आहे. कोपर्डीतील पिडीतेलाही अद्याप न्याय मिळालेला नाही. या पिडीतेच्या मारेकर्‍यांना फासावर कधी लटकवणार? या मागण्यांसाठी आम्ही मुख्यमंत्र्यांच्या पायाशी जाणार नाही, असा निर्धार मराठा समाजाने केल्याचे मराठा क्रांती मोर्चाचे प्रतिनिधी विनोद पोखरकर यांनी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. भाजपला धडा शिकवण्यासाठी लोकसभा निवडणुकीत आता मराठा क्रांती मोर्चाही आपले उमेदवार उभे करणार असल्याचे ते म्हणाले.

मराठा आरक्षण आंदोलनात मराठा तरुणांनी बलिदान दिलं. मात्र सरकारला त्याची कदर नाही. त्यामुळे कमळाला नाकारा हीच भूमिका आज आमची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेस राष्ट्रवादीने आमची त्यावेळी फसवणूक केली होती. या सरकारने यावेळी आमची फसवणूक केली. सध्याच्या सरकारकडून खूप अपेक्षा होत्या पण त्या सगळ्याच फोल ठरल्याचे पोखरकर म्हणाले. जे आरक्षण लढून मिळालेले आहे. ते वाचवण्याची आमच्यावर जबाबदारी आहे. सरकारने सुनावणीत पुरेशी बाजू मांडली नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जे आश्वासन आम्हाला दिले होते. ते पूर्ण झाले नाही. राज्य सरकारमधील आणि भाजपचे काही नेते म्हणत आहेत की, मराठा समाजाला आम्ही आरक्षण दिले. मात्र मराठ्यांना अजून काहीही मिळालेले नाही, असेही पोखरकर म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -