घरताज्या घडामोडी'अन्यथा ११ ऑक्टोबरच्या MPSC परीक्षा उधळून लावू', मराठा संघटनांचा इशारा!

‘अन्यथा ११ ऑक्टोबरच्या MPSC परीक्षा उधळून लावू’, मराठा संघटनांचा इशारा!

Subscribe

मराठा समाजाला राज्य सरकारने दिलेलं आरक्षण न्यायालयानं स्थगित केल्यानंतर मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा पेटू लागला आहे. आता मराठा क्रांती मोर्चा आणि सर्व मराठा संघटनांकडून राज्यात येत्या रविवारी म्हणजेच ११ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या परीक्षा उधळून लावण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. ‘राज्यात येत्या रविवारी होणाऱ्या MPSC परीक्षांमुळे मराठा समाजाचं नुकसान होणार आहे. त्यामुळे या परीक्षा राज्य सरकारने आणि MPSC ने पुढे ढकलाव्यात. अन्यथा राज्यातल्या सर्व केंद्रांवर मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते धडकतील. परीक्षा उधळून लावली जाईल’, असा इशारा मराठा संघटनांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकार यासंदर्भात कोणता निर्णय घेणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

तुमच्या आमदारांना प्रश्न विचारा!

राज्यभरातल्या मराठा संघटनांच्या प्रतिनिधींची आज नवी मुंबईत बैठक झाली. या बैठकीमध्ये खासदार छत्रपती संभाजी राजे भोसले यांच्यासह मराठा समाज संघटनांचे अनेक मोठे नेते उपस्थित होते. यावेळी मराठा आरक्षण आणि MPSC परीक्षा या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. या बैठकीनंतर नरेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन बैठकीत चर्चा झालेल्या मुद्द्यांविषयी माहिती सांगितली. ‘MPSCने काही निर्णय घेतला नाही, तर मराठा क्रांती मोर्चाचे सर्व कार्यकर्ते राज्यभरातल्या एमपीएससी केंद्रांवर धडक देतील. मराठा समाजातली मुलं आम्हाला विनंती करत आहेत की तुम्ही सरकारला सांगा. मी म्हणेन, तुमच्या मतदारसंघातल्या आमदारांच्या घरी उद्या सकाळी जा आणि त्यांना ही विनंती करा. जर त्यानं ऐकलं नाही, तर काय करायचं ते पुढे सांगू. पण परीक्षा झाली तर ती उधळून लावू. रविवारी परीक्षा होऊ दिली जाणार नाही’, असं ते म्हणाले.

- Advertisement -

UPSC बाबत झालं, तेच MPSC बाबत होणार

‘११ तारखेला MPSC ची परीक्षा आहे. पण त्यामुळे मराठा समाजाचं नुकसान होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर आधी पोलीस भरती आणि आता एमपीएससी यामुळे मराठा समाजात असंतोष निर्माण झालेला आहे. राज्य सरकारने हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाच्या मोठ्या खंडपीठाकडे पाठवण्यासाठी प्रयत्न करावेत. यूपीएससीची परीक्षा झाली तेव्हा नवी मुंबईतल्या एका सेंटरमध्ये फक्त १५० विद्यार्थी उपस्थित होते. म्हणजेच कोरोनामुळे काही मुलं परीक्षेला येऊ शकली नाही, काही आजारी पडली. तसाच प्रकार एमपीएससीबाबत होणार आहे. मुख्यमंत्री म्हणतात आम्ही मराठा समाजासोबत आहोत. त्यामुळे एमपीएससी परीक्षा मुख्यमंत्र्यांनी पुढे ढकलावी’, अशी मागणीही यावेळी नरेंद्र पाटील यांनी मराठा समाजाच्या वतीने केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -