घरमुंबईआरक्षणासाठी मराठा समाजाचा एल्गार; मुंबईत 'मातोश्री'वर मशाल मोर्चा धडकणार

आरक्षणासाठी मराठा समाजाचा एल्गार; मुंबईत ‘मातोश्री’वर मशाल मोर्चा धडकणार

Subscribe

मराठा आरक्षण लागू व्हावं, सुप्रिम केर्टात ते टिकावं, यासाठी मराठा क्रांती मोर्चाने आज मशाल मार्चचे आयोजन

आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी मराठा समाजाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. मराठा क्रांती मोर्चा प्रतिकात्मक मशाली घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान म्हणजेच मातोश्रीवर धडकणार आहे. मुंबईत मराठा क्रांती मोर्चा मशाल मार्च आज सायंकाळी ५ वजात मातोश्रीवर धडकणार आहे.  मराठा आरक्षण लागू व्हावं, सुप्रिम केर्टात ते टिकावं, यासाठी मराठा क्रांती मोर्चाने आज मशाल मार्चचे आयोजन केले आहे. मात्र, मराठा क्रांती मोर्चा अजूनपर्यंत सर्व नियम पाळून, शांततेत झाला आहे. त्याप्रमाणेच आजचा मशाल मार्चही शांततेत काढण्यात येईल. मोर्चेकरी हे बांद्रा कलेक्टर कार्यालयाच्या समोरे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानात जमणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मोर्चासाठी पूर्व तयारी म्हणून बॅरिकेट्सची व्यवस्था करण्यात आली आहे. यासह सुरक्षा व्यवस्थेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबर वांद्रे, खेरवाडी येथे पीडब्ल्यूडी ग्राऊंडमध्ये वाहने पार्किंगची सोय करण्यात आली आहे. मोर्चेकर्त्यांच्या वतीने मातोश्रीवर माननीय मुख्यमंत्र्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे.

- Advertisement -

मराठा क्रांती मशाल मोर्चाची नियमावली

  • आपल्या मशाली या प्रतीकात्मक असतील.
  • कायदा सुव्यवस्थेचा आदर करता कृपया खऱ्या मशाली आणू नयेत.
  • आपापली वाहने नेमून दिलेल्या वाहनतळावर पार्क करून शांततेच्या मार्गाने दिलेल्या नियोजित ठिकाणी जमावे.

पंढरपूर ते मंत्रालय आक्रोश मोर्चा

दरम्यान, पंढरपुरात मराठा ठोक मोर्चाच्या वतीने आक्रोश मोर्चाल सुरुवात होणार आहे. या मोर्चाला प्रशासनाकडून परवानगी मिळालेली नाही. पंढरपुरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. राज्य राखीव दलाचे जवानही तैनात करण्यात आले आहेत. या दोन्ही मोर्चांकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन मराठा ठोक मोर्चाच्यावतीने आज पंढरपूर ते मंत्रालय आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे, पंढरपुरातून पायी चालत मराठा कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने निघणार आहेत. मात्र या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पंढरपुरात संचारबंदी लागू केली आहे. तर पंढरपुरच्या दिशेने येणारी एसटी वाहतूकही थांबवण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याचे सांगितले जात आहे.


विद्यार्थी, शिक्षकांसाठी खुशखबर: दिवाळीची सुट्टी आता १४ दिवस मिळणार
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -