घरमनोरंजन'त्या' विचित्र नृत्यामुळे माधवी जुवेकरची हकालपट्टी

‘त्या’ विचित्र नृत्यामुळे माधवी जुवेकरची हकालपट्टी

Subscribe

वडाळा आगारातील सप्लाय विभागात कार्यरत असणाऱ्या सात कर्मचाऱ्यांना सेवेतून बडर्फ करण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला आहे. यामध्ये अभिनेत्री माधवी जुवेकर हिचाही समावेश आहे. गेल्या वर्षी दसऱ्या निमित्त केलेल्या पार्टीत धिंगाणा घातल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.

मुंबईच्या वडाळा आगारात गेल्या वर्षी नृत्य करत पैशाची उधळण करणे हे तेथील काही कर्मचाऱ्यांना चांगलेच भोवले आहे. बेस्ट प्रशासनाने या नृत्यात सहभागी असलेल्या ७ कर्मचाऱ्यांना कामावरून बडतर्फ करण्याचे आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे यामध्ये मराठी अभिनेत्री माधवी जुवेकर यांचाही समावेश आहे. तर ५ कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती रोखण्याची शिफारसही करण्यात आली आहे. साधारण वर्षभरापूर्वी घडलेल्या या घटनेबाबत बेस्टच्या प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली असून दोन दिवसांपूर्वी यासंबंधीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. वडाळा आगारातील सप्लाय विभागातील हे सर्व कर्मचारी असल्याचे सांगितले जात आहे. मात्र बेस्ट प्रशासनाचा हा निर्णय जाचक असल्याचे या कर्मचाऱ्यांकडून बोलले जात आहे.

पैशाची उधळण करणारा व्हिडिओ व्हायरल

वडाळा बेस्ट आगारात गेल्या वर्षी दसऱ्याच्या निमित्ताने पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अभिनेत्री माधवी जुवेकरसोबत इतर काही महिला कर्मचाऱ्यांनी बिनधास नृत्य सादर केले. या पार्टीत पैशांची उधळणही करण्यात आली होती. या नृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्याच्यावर सर्व स्तरातून टीका होऊ लागली. एकीकडे बेस्टटे कर्मचारी आर्थिक विवंचनेतून जात असताना संप करत आहेत. तर दुसरीकडे कर्मचारी स्वतःच तोंडा नोटा पकडून एकमेकांवर पैशांची उधळण करत धिंगाणा घालत आहेत, याबाबत संताप व्यक्त करण्यात आला होता. मात्र व्हिडिओमध्ये उधलेल्या नोटा खोट्या असल्याचा दावा माधवी जुवेकरने केला होता.

- Advertisement -

एकूण १२ कर्मचारी चौकशीच्या फेऱ्यात 

दरम्यान, याप्रकरणी विभागीय चौकशी सुरु होती. चौकशीसाठी वरळी बेस्ट डेपोचे उपव्यवस्थापक एन. आर. जोशी यांची नेमणूक करण्यात आली होती. यासंदर्भात याआधीच बेस्टचे उपदक्षता आणि सुरक्षा अधिकारी इंदूलकर यांनी आपला अहवाल सादर केला होती. त्या अहवालाच्या आधारे अभिनेत्री माधवी जुवेकरसह एकूण १२ अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी सुरू करण्याचे आदेश बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांनी दिले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -