घरताज्या घडामोडीमराठी कलाकार साकारणार २५ थरांची दहिहंडी!

मराठी कलाकार साकारणार २५ थरांची दहिहंडी!

Subscribe

कायद्याचा सन्मान राखत नियमावलीचे पालन करून मराठी व्यावसायिक वाद्यवृंद कलाकारांनी २५ थरांची दहिहंडी साकारण्याचा निर्णय घेता आहे.

कायद्याचा सन्मान राखत नियमावलीचे पालन करून मराठी व्यावसायिक वाद्यवृंद कलाकारांनी २५ थरांची दहिहंडी साकारण्याचा निर्णय घेता आहे. मार्च, एप्रिल, मे हा उत्सव जत्रा-यात्रा, विवाह सोहळ्यांचा असतो. मात्र यंदा कोरोनामुळे हे कार्यक्रम होऊ न शकल्याने मराठी वाद्यवृंदातील लोककलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. परिस्थिती बिकट असतानाही आसवे न गाळता स्वत:चे दु:ख बाजुला सारून दुसर्‍याला आनंद देणारा कलाकार असतो, त्यामुळे मराठी व्यावसायिक वाद्यवृंद निर्माता संघ व कलानिधी समिती या संस्थेमार्फत ‘एक अनोखी दंहिहंडी’ साजरी करण्यात येणार आहे.

एकाच दिवशी पंचवीस ठिकाणी वृक्षारोपण

लॉकडाऊन ही पर्यावरण संवर्धनाची उत्तम संधी असल्यामुळे १२ ऑगस्टला वाद्यवृंदातील कलाकार ज्येष्ठ वृक्षतज्ज्ञ विक्रम यंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दीर्घकाळ टिकणारी डेरेदार सावली देणार्‍या भारतीय प्रजातीच्या वृक्षांचे एकाच वेळी एकाच दिवशी पंचवीस ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येणार आहे. यासाठी विविध विभागात २५ तुकड्या केल्या जाणार आहेत. त्यांच्या माध्यमातून सकाळी ८ ते १२ या वेळेत तब्बल १००० वृक्ष संपुर्ण मुंबई व उपनगरात लावले जाणार आहे. या उपक्रमाचा पूर्व द्रुतगती मार्गावरील विक्रोळी कन्नमवार नगर, उड्डानपुला शेजारी सकाळी ८ वाजता शुभारंभ होईल. त्यानंतर सागरी किनार्‍याची स्वच्छता. त्याच दिवशी दुपारनंतर हे सर्व कलाकार मुंबई व उपनगरालगत परिसरातील समुद्र किनार्‍यावर तब्बल आठ ठिकाणी साफसफाई मोहिम राबविण्यात येणार आहे. १५ ऑगस्टला कोरोनामुळे बेरोजगार झालेल्या वाद्यवृंद कलाकारांच्या घरोघरी गणेशोत्सवातून आनंद देता यावा व सहाय्य व्हावे या करिता मिष्टान्न तयार करता येईल अशी अन्नधान्याची पाकिटे संस्थेच्या माध्यमातून वाटण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे १६ ऑगस्टला संस्थेचे स्वयंसेवक रस्त्यावर पडलेले राष्ट्रध्वज व बिल्ले शोधून त्याचे संकलन व योग्य सन्मान करणार आहेत.

- Advertisement -

गणेशोत्सव मंडपात जाऊन प्रबोधन

यंदा गणेशोत्सव साधेपणाने साजरा होत असल्याने कोकत्या प्रकारचे अवधान मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी राखायचे यासाठी हे सर्व कलाकार सामाजिक अंतर राखून दिलेल्या नियमांचे पालन करत गणेशोत्सव मंडपात जाऊन प्रबोधन करणार आहेत पर्यावरण व सामाजिक बांधिलकी जपत एक अनोख्या पध्दतीने मराठी सणासुदीला साजरा करणे हा बहुउद्देश या संस्थेचा असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष उदय साटम यांनी परिपत्रकाद्वारे दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -