मराठी कलाकारांनी दिल्या दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा

आपले आवडते कलाकार आपल्या घरी राहून दिवाळी साजरी करत आहेत.

मराठी कलाकारांनी दिल्या दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा

कोरोना संकट अजून संपलेले नसले तरी दिवाळीचा मोठा उत्साह दिसून येत आहे. सगळीकडे दिवळीची धामधूम दिसत आहे. आपले आवडते कलाकार आपल्या घरी राहून दिवाळी साजरी करत आहेत. कलाकारांनी आपल्या चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहे.

अभिनेता रितेश देशमुखने प्रेक्षकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. रितेशने त्याच्या आईची साडी वापरून दिवाळीसाठी खास कपडे तयार केले आहेत. रितेशने त्याच्या दोन्ही मुलांसोबत प्रेक्षकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शुभेच्छा देतानाचा एक व्हिडिओ रितेशने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

अभिनेत्री अमृता खानविलकरने तिच्या चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पांढऱ्या साडीतला फोटो अमृताने तिच्या सोशल मीडियावर शेअर करून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अमृताने नाकात मोत्याची नथ घातली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

प्रेक्षकांची लाडकी जोडी म्हणजे प्रिया बापट आणि उमेश कामत. या मराठमोळ्या जोडीने प्रेक्षकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. प्रिया आणि उमेशचा पारंपरिक पोषाखातला फोटो प्रियाने तिच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Priya Bapat (@priyabapat)

अभिनेता सुबोध भावे सोशल मीडियावर सक्रिय असतो. सुबोध भावेने त्याच्या कुटुंबासोबत त्याच्या चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दिवाळीच्या शुभेच्छा देत एक व्हिडिओ शेअर केला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Subodh Bhave (@subodhbhave)

अभिनेत्री नृत्यांगणा उर्मिला कानेटकर कोठारेने प्रेक्षकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दिवाळीच्या पहिल्या दिवशी गुलाबी आणि पांढऱ्या रंगाची साडी नेसली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Urmilla Kothare (@urmilakothare)

बिग बॉस फेम शर्मिष्ठा राऊत लॉकडाउन दरम्यान लग्नबंधनात अडकली. शर्मिष्ठाने तिच्या नवऱ्यासोबतचा फोटो शेअर करत तिच्या चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sharmishtha Raut (@sharmishtharaut)

कॉमेडी किंग कुशल बद्रिकेने रोषणाईने नटलेल्या घरासोबतचा फोटो शेअर करत चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. कुशलच्या फोटोमध्ये त्याचे आलिशान घर दिसत आहे. घराला सुंदर अशी रोषणाई करण्यात आली आहे.