घरमुंबईडॉक्टरांच्या काम बंद आंदोलनाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही!

डॉक्टरांच्या काम बंद आंदोलनाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही!

Subscribe

कोलकातामध्ये डॉक्टरांना मारहाण करण्यात आलेल्या घटनेच्या निषेधार्थ देशभरातील डॉक्टरांनी निषेध नोंदवला. मुंबईक मार्डच्या डॉक्टरांनी संप पुकारत निषेध केला. मात्र, याचा रुग्णसेवेवर परिणाम झाला नाही.

कोलकातामध्ये शिकाऊ आणि निवासी डॉक्टरांना झालेल्या मारहाणीच्या घटनेचे पडसाद संपूर्ण देशभर उमटले. शुक्रवारी राज्यातील डॉक्टरांनी निषेध नोंदवत सकाळी ८ ते ५ या वेळेत रूग्णसेवा बंद ठेवली होती. त्यामुळे मुंबईसह राज्यातील सरकारी हॉस्पिटलमधील रूग्णसेवेवर थोडाफार फरक पडला. तर, मुंबईतील प्रमुख हॉस्पिटलमधील रूग्णसेवेवर जास्त परिणाम न झाल्याचं हॉस्पिटल प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. मात्र असं असलं तरी एरवी रुग्णांच्या मदतीला लगेच धावून जाणारे डॉक्टर्स ओपीडीत न दिसल्यामुळे रुग्णांची धावपळ होताना दिसली.

बाह्यरुग्ण विभागातही डॉक्टरांनी बजावली कामगिरी

शुक्रवारी केलेल्या काम बंद आंदोलनात ४५०० निवासी डॉक्टर तर, ५ हजार इंटर्न डॉक्टरांनी सहभाग घेतल्याचे मध्यवर्ती मार्ड आणि इंटर्न डॉक्टरांची संघटना अस्मीकडून सांगण्यात आले. निषेध आंदोलन करण्याचा निर्णय घेतल्यानंतर रूग्णसेवा ज्येष्ठ डॉक्टर, प्राध्यापक आणि इतर कर्मचाऱ्यांनी दिली. बाह्यरुग्ण सेवा बंद ठेवणार असल्याचं आधी सांगण्यात आलं होतं. पण, बाह्यरूग्ण विभागात वरिष्ठ प्राध्यापक आणि इतर डॉक्टरांनी ही कामगिरी बजावली. या आंदोलनात निवासी डॉक्टरांची मध्यवर्ती मार्ड, इंटर्न डॉक्टरांची अस्मी संघटना सहभागी होत्या. तर, महाराष्ट्र असोसिएशन ऑफ बॉन्डेड सिनियर्स रेसिडंट डॉक्टर संघटना, इंडियन मेडिकल असोसिएशन सारख्या संघटनांनी आंदोलनाला पाठिंबा दिला होता.

- Advertisement -

हेही वाचा – कोलकाता डॉक्टर मारहाणीचे पडसाद राज्यात

रुग्णसेवेवर परिणाम नाही

नायर हॉस्पिटलमधील एकूण ५२५ निवासी डॉक्टर्स या संपात सहभागी होते. ‘बाह्यरूग्ण कक्षात ९०७ जणांना तर, अंतर्गत ६५ रूग्णांना तपासण्यात आले. एकूण, शस्त्रक्रियांमध्ये ८ मोठ्या, ३ एलएससीएस, ६ कॅथलॅब आणि ३ प्रसुती करण्यात आल्या. तसेच आपात्कालीन विभागही सुरू होता, असं नायर हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी सांगितलं.‌ तर, शीव हॉस्पिटलमध्ये ९९ टक्के ओपीडी सुरू होत्या. केईएममध्ये ही साधारण परिस्थिती होती. सकाळी ८ ते १२ च्या दरम्यान मेजर आणि मायनर ७० ते ८० शस्त्रक्रिया झाल्याचं केईएमचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितलं.

केईएम मार्डचे रक्तदान

देशभर डॉक्टरांचे निषेध आंदोलन सुरू असताना केईएम हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी देखील निषेध केला. पण, शुक्रवारी १४ जून हा जागतिक रक्तदान दिन म्हणून ओळखला जातो. त्या निमित्ताने आंदोलनानंतर डॉक्टरांनी रक्तदान केले. एकूण ६०० डॉक्टरांनी रक्तदान केल्याचे केईएमचे डॉ. दीपक मुंडे यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -