घरमुंबई'निवासी डॉक्टरांचा छळ थांबवा', जे. जे. रुग्णालयात ऑनलाईन मोहीम

‘निवासी डॉक्टरांचा छळ थांबवा’, जे. जे. रुग्णालयात ऑनलाईन मोहीम

Subscribe

मार्डच्या जे. जे. हॉस्पिटलमधील निवासी डॉक्टरांनी रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. राजश्री कटके यांच्याविरोधात मानसिक छळ करत असल्याची तक्रार करत ऑनलाईन मोहीम छेडली आहे.

राज्य सरकारच्या जे.जे. समूह रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. राजश्री कटके यांच्या विरोधात सध्या मार्ड संघटनेने मोहीम छेडली आहे. एका विद्यार्थिनीने डॉ. कटके मानसिक छळ करत असल्याची तक्रार केल्यानंतर सर्वच निवासी डॉक्टर त्याचा पाठपुरावा करत आहेत. याच पार्श्वभूमीवर ‘निवासी डॉक्टरांचा छळ थांबवा’ अशी मोहीम मार्ड कडून छेडण्यात आली असून माहिमेला पाठिंबा देण्याचे आवाहन जे.जे. रुग्णालय मार्डचे अध्यक्ष डॉ. उमंग यांनी केलं आहे.

मानसिक छळाचा आरोप

डॉ. राजश्री काटके यांनी एका विद्यार्थिनीला बऱ्याच वेळा खूप वेळ थांबवून ठेवलं. तसेच इतर मानसिक छळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच इतरही डॉक्टरांकडून आर्थिक मागणी होत असल्याचा आरोप आता निवासी डॉक्टर करत आहेत. खर्चाची तजवीज विद्यार्थ्यांनी करावी अशी ताकीद देखील डॉ. कटके देत असल्याचं या निवासी डॉक्टरांचं म्हणणं आहे. याची वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाकडे तक्रार करण्यात आली आहे. या प्रकरणाची चौकशी त्वरीत व्हावी, ही चौकशी प्रक्रिया पारदर्शक असावी, डॉ. कटकेंना दुसऱ्या आरोग्य संस्थेत पाठवावे, परिक्षक म्हणून डॉ. कटकेंना नेमू नये, तसंच, त्यांना पदव्युत्तर विषयाचे मार्गदर्शक म्हणून नेमू नये अशा काही मागण्या या डॉक्टरांनी केल्या आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – जे. जे. रुग्णालयात डॉक्टरांची सुरक्षा वाऱ्यावर

अधिष्ठातांचं चौकशीचं आश्वासन

‘या बैठकीत चौकशी पारदर्शकपणे पार पडली जाईल’, असे आश्वासन अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी दिल्याचे जे. जे. मार्डचे अध्यक्ष डॉ. उमंग यांनी सांगितले. ‘डॉ. कटके यांच्याविरोधातील तपासणी चार दिवसांत पूर्ण न झाल्यास आम्ही तीव्र कारवाई करु’, असा इशाराही जे.जे. मार्डकडून दिला गेला आहे.

जे.जे. मार्डची फेसबुक मोहीम

दरम्यान, ‘राज्यभरातील वैद्यकीय रुग्णालयात निवासी डॉक्टरांची आर्थिक पिळवणूक केली गेल्यास निवासी डॉक्टरांनी निनावी तक्रार करावी’, असे आवाहन जे.जे. मार्डच्या फेसबुक पेजवरून करण्यात आले आहे. या पेजवर गुरुवारी सकाळी दहा वाजल्यापासून तक्रार नोंदवता येऊ शकते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -