घरमुंबईडॉक्टरांच्या सुरक्षेसाठी मार्डची शासनाकडे धाव

डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी मार्डची शासनाकडे धाव

Subscribe

नायर हॉस्पिटलमध्ये मारहाण प्रकरणानंतर मार्डतर्फे प्रशासनाला निवेदन सादर करण्यात येणार आहे.

कोलकत्यात ज्युनियर डॉक्टरला रुग्णांच्या नातेवाईकांकडून झालेल्या मारहाणीचा प्रकार घडला असतानाच रविवारी सायंकाळी पुन्हा नायर हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांवर हल्ला करण्यात आला. यासंदर्भात, हॉस्पिटलमध्ये अधिष्ठात्यांशी मार्डने चर्चा केली. तसंच, डॉक्टरांवर होणार्‍या हल्ल्यासंदर्भात शासनाच्या संबंधित विभागाला लवकरच पत्र देण्यात येणार असल्याचे मार्डकडून सांगण्यात आलं आहे.

सुरक्षारक्षकही होतात हतबल

कामाच्या ठिकाणी डॉक्टरांना सुरक्षित वातावरण देण्यास सरकार अपयशी ठरत असल्याचा आरोप अनेकदा मार्डच्या वतीने करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे नेमलेल्या सिक्युरीटी गार्डला योग्य पद्धतीचे ट्रेनिंग दिलेले नसते. त्यामुळे, २०० नागरिकांनी हल्ला केला तर सुरक्षारक्षकही काही करू शकत नाही.

- Advertisement -

हेही वाचा – अवयवदानासाठी आता वेबसाईटची होणार मदत!

डॉक्टर प्रोटेक्शन अ‍ॅक्टमध्ये बदलाची मागणी

तसंच, पोलिसांकडूनही अटक होताना त्यातील ५ ते १० हल्लेखोरांना अटक होते. त्यावरही ठोस कारवाई होत नाही आणि झालेल्या कारवाईतही दिरंगाई होते. त्यामुळे, अगेन्स्ट हॉस्पिटल वॉईलेस्न अ‍ॅक्ट करणे गरजेचे आहे किंवा डॉक्टर प्रोटेक्शन अ‍ॅक्टमध्ये बदल करून कायदा कडक करण्यात यावा अशा आशयाचे पत्र शासनाला देण्यात येणार आहे. तसंच, डॉक्टरांना झालेल्या मारहाणीच्या प्रकरणांची आकडेवारीही शासनासमोर ठेवण्यात येणार असल्याची माहिती मार्डकडून देण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -