घरमुंबईगणेशोत्सवासाठी मुंबईतील बाजारपेठा गर्दीने फुलल्या

गणेशोत्सवासाठी मुंबईतील बाजारपेठा गर्दीने फुलल्या

Subscribe

अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी सर्व मुंबापुरी सज्ज झाली आहे. गणेशोत्सवासाठी लागणार्‍या साहित्याची मोठी खरेदी होताना दिसत आहे. यामध्ये पूजेचे साहित्य, बाप्पांसाठी दागिने, कापड या सारख्या विविध गोष्टींचा समावेश आहे.

मुंबई : मुंबईतसह राज्यात गणेशोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. एकीकडे मुंबईत सध्या बहुतांश मोठ्या मंडळांनी आपल्या लाडक्या गणपतीचे आगमन सोहळे पार पाडले असून श्रींच्या मंडपातील सजावट शेवटच्या टप्प्यात आली आहे. दुसरीकडे घरगुती गणपतींसाठी लोकांची जोरदार खरेदी सुरू आहे. गणेशोत्सवाला लागणार्‍या साहित्यासाठी लालबाग,परळ, दादर, भागात मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. यामध्ये बहुतांश लोक इकोफ्रेंडली मखर आणि साजवटीच्या साहित्याला पसंती देताना दिसत आहेत.

अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी सर्व मुंबापुरी सज्ज झाली आहे. गणेशोत्सवासाठी लागणार्‍या साहित्याची मोठी खरेदी होताना दिसत आहे. यामध्ये पूजेचे साहित्य, बाप्पांसाठी दागिने, कापड या सारख्या विविध गोष्टींचा समावेश आहे.

- Advertisement -

नैवेद्य

बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करताना बाप्पाला विविध प्रकारचा नैवेद्य दाखवला जातो. यामध्ये प्रामुख्याने हिरवा माट या पाले भाजीचा समावेश असतो. मुंबईतच्या बाजारपेठेत सध्या या भाजीची आवक वाढली आहे.

शुगर फ्री मोदक

बाप्पाला अतिप्रिय असणारे मोदक भाविकांकडून आवर्जून नैवेद्य म्हणून दाखवले जातात. मात्र अनेक भाविक मधुमेह, अतिस्थूलपणा किंवा इतर आजारांमुळे त्याचा प्रसाद म्हणून आस्वाद घेऊ शकत नाहीत. त्यासाठी एक उत्तम पर्याय म्हणून सध्या मिठाईवाल्यांकडे शुगर फ्री मोदक उपलब्ध आहेत.

- Advertisement -

खर्‍या फुलांना प्राधान्य

पूजेसोबतच सजावटीसाठी फुलांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. भाविक प्लास्टिकच्या फुलांपेक्षा सजावटीसाठी खर्‍या फुलांना प्राधान्य देत आहेत.

मूर्तीशाळांमध्ये काम अंतिम टप्यात

गणेशोत्सवासाठी मुंबईतील विविध गणेश मूर्तीशाळांमध्ये लगबग सुरू आहे. मूर्तिकार गणेशमूर्तींवर शेवटचा हात फिरवण्यात गुंतले आहेत. विशेष म्हणजे मूर्तीशाळांमध्ये दिवसाला २२ तास मूर्तिकार आणि अन्य कारागीर कार्यरत आहेत.

गणेशोत्सवासाठी महापालिका सज्ज

श्री गणेशोत्सव आगमनाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महापालिकेने चौपाटयांसह श्री. गणेश विसर्जन स्थळांवर सर्व सुविधांनीयुक्त उत्तम अशी व्यवस्था केली असून गणेशाच्या आगमनासाठी महापालिकेची यंत्रणा सज्ज असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

गिरगांव चौपाटी ही दक्षिण मुंबई शहरातील एक अत्यंत महत्त्वाची आणि प्रख्यात ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेली चौपाटी असून या चौपाटीवर दक्षिण व मध्य मुंबईतील अनेक छोटी / मोठी सार्वजनिक मंडळे आपल्या गणेशमूर्तींचे विसर्जन दरवर्षी अत्यंत आनंदाने व भक्तीभावाने करतात.

यासाठी पालिकेने आपली यंत्रणा सर्व सुविधांयुक्त सज्ज ठेवली आहे. महापालिकेतर्फे गिरगांव चौपाटीवर पूर्वतयारी करण्यात येते. सदर पूर्वतयारी साधारणपणे गणेश चतुर्थीच्या पूर्वी म्हणजेच जवळ-जवळ दीड ते दोन महिने आधीपासून करावी लागते. यामध्ये नैसर्गिक विसर्जन स्थळे ६९ असून कृत्रिम विसर्जन स्थळे ३१ आहे. त्यासोबतच विसर्जन स्थळांवर पुरविण्यात आलेल्या सुविधांमध्ये स्टील प्लेट ८४०, नियंत्रण कक्ष ५८, जीवरक्षक ६०७, मोटरबोट ८१, प्रथमोपचार केंद्र ७४, रुग्णवाहिकांची संख्या ६०, स्वागत कक्ष ८७, तात्पुरती शौचालये ११८, निर्माल्य कलश २०१, निर्माल्य वाहन/डंपर १९२, फ्लड लाईट १९९१, सर्च लाईट १३०६, निरिक्षण मनोरे ४८, जर्मन तराफा ५०, मनुष्यबळ (कामगार) ६१८७, मनुष्यबळ (अधिकारी) २४१७ आदींची व्यवस्था करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -