मुंबईतील मालाड येथे गोदामाला भीषण आग; भीषण व्हिडिओ पाहा

मालाडच्या पठाणवाडी येथे भीषण आग

मुंबईच्या मालाड पुर्व येथील पठाणवाडी परिसरातील त्रिवेणी नगर येथे असलेल्या अमन मार्बल कंपनीला भीषण आग लागल्याची माहिती मिळत आहे. ही आग सायंकाळी ६.१८ वाजता लागल्याचे सांगितले जात आहे. तर ६ वाजून ५१ मिनिटांनी अग्निशमन दलाने ही लेव्हल २ ची आग असल्याचे घोषित केले. घटनास्थळी अग्निशमन दल, पोलीस, रुग्णवाहिका आणि बचाव पथक दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

अग्निशमन दलाच्या जवानांनी सांगितले की, ही आग एका प्लायवूडच्या गोदामाला लागली आहे. या गोदामाचा आकार ७ ते ८ हजार चौरस मीटर असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.