घरगणपती उत्सव बातम्यासचिन तेंडुलकरचे चाहत्यांना भावनिक आवाहन

सचिन तेंडुलकरचे चाहत्यांना भावनिक आवाहन

Subscribe

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने यंदा आपल्या घरातील बाप्पाचे विसर्जन घरामध्येच करण्याचे योजले आहे. समुद्र किनाऱ्यांवर विसर्जनानंतर दिसणारे चित्र खुपच त्रासदायक असल्यामुळे त्याने आपल्या चाहत्यांनाही घरामध्येच बाप्पा विसर्जन करण्याचे आवाहन केले आहे.

भारतरत्न, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर नेहमीच समाजाभिमुख कार्यांमध्ये अग्रेसर राहिला आहे. आपल्या विविध उपक्रमांमधून त्याने नेहमीच सामाजिक संदेश त्याच्या चाहत्यांना दिला आहे. सध्या गणेशोत्सवाचा सण संपूर्ण राज्यभरात उत्साहात सुरू असून याही सणाला सचिन तेंडुलकर याने एक व्हिडिओ शेअर करून पर्यावरणाच्या संवर्धनाच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. सर्वांनाच माहिती आहे की, माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर याच्या घरामध्येही गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना केली जाते. या बाप्पाला निरोप देण्यासाठी सचिनने नवीन आणि पर्यावरणाला सोईस्कर असा प्रयोग करण्याचे निश्चित केले आहे.

काय आहे या व्हिडिओमध्ये

गणेशोत्सवाच्या काळात आपल्या लाडक्या बाप्पाचे विसर्जन समुद्रामध्ये केल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांच्या मूर्ती ज्या भग्नावस्थेत समुद्राच्या किनाऱ्यावर येतात, त्याला पाहून मन छिन्नविछिन्न होते, असे सचिनने या व्हिडिओमध्ये म्हटले आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षापासून आपल्यातच टबमध्ये पाणी भरून त्यात बाप्पाचे विसर्जन करण्याची इच्छा त्याने व्यक्त केली. आपल्या आईशी आणि पुजाऱ्यांशी संवाद साधून त्यांची परवानगी घेऊन सचिन यावेळी आपला लाडका बाप्पा घरामध्येच पाण्यात विसर्जीत करणार असल्याचे त्याने म्हटले आहे.

- Advertisement -

मुंबईच्या समुद्र किनाऱ्यांवरील दृष्य त्रासदायक 

दरवर्षी लाखोंच्या संख्येने मुंबईच्या विविध समुद्र किनाऱ्यांवर गणपती बाप्पाचे विसर्जन केले जाते. मोठमोठ्या गणरायांच्या मुर्त्या समुद्राच्या पाण्यात सोडल्या जातात. परंतू, प्लास्टर ऑफ पॅरिसने बनलेल्या या मुर्त्यांचे अवशेष दुसऱ्या दिवशी समुद्रच्या लाटेसोबत पुन्हा किनाऱ्यावर येतात. आपल्या देवाचे हे रुप पाहणं कोणालाच आवडतं नाही. नेमक्याच गोष्टीकडे सचिनने लक्ष वेधले आहे. त्यामुळे प्रत्येकाने शाडू मातीच्या, इको फ्रेंडली बाप्पाची प्रतिष्ठापना करून नंतर ती घरामध्येच पाण्यात विसर्जीत करावी, असे सचिनने सुचवले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -