घरमुंबईई-लर्निंगच्या माध्यमातून गणित व विज्ञान आता हिंग्लिशमध्ये

ई-लर्निंगच्या माध्यमातून गणित व विज्ञान आता हिंग्लिशमध्ये

Subscribe

इंग्रजी माध्यामातून मुलांना शिक्षण देण्याकडे पालकांचा कल असला तरी अनेक मुलांना इंग्रजी भाषा पेलण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. त्यातच विद्यार्थ्यांना गणित व विज्ञानमधील क्लिष्ट संकल्पना शिकताना व समजून घेताना विद्यार्थ्यांना संघर्ष करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना आता हिंग्लिशमधून ‘ई-लर्निंग’च्या माध्यमातून शिक्षण देण्यासाठी ‘लिडो लर्निंग’ पद्धतीचा मार्ग अवलंबण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांना गणित व विज्ञान हे विषय नेहमीच क्लिष्ट वाटतात. परंतु जर विद्यार्थ्यांना जवळच्या वाटणार्‍या भाषेतून शिक्षण दिल्यास त्यांना ते समजण्यास सोपे जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना हिंग्लिशमध्ये (हिंदी आणि मराठी भाषा मिळून हिंग्लिश भाषा) शिक्षण देण्याचा उपक्रम लिडो लर्निंगच्या माध्यमातून राबवण्यात येणार आहे. हिंग्लिशमुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळण्याबरोबरच त्यांना संकल्पना समजून घेण्यासही मदत होणार आहे. लिडो लर्निंगमुळे त्यांना लहान वयातच अभ्यासक्रमाच्या पलीकडे जाऊन विचार करण्याची सवय लागेल. ही महत्त्वपूर्ण कौशल्ये अवगत केल्यावर विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये उत्तम कामगिरी करता येईलच, शिवाय भविष्यातील करिअरमध्ये व खासगी जीवनातही यश मिळवता येईल. भारतीय शिक्षण व्यवस्थेत केवळ गुणांना महत्त्व दिले जाते. २१ व्या शतकातील विश्लेषणात्मक विचार, क्रिटिकल रिझनिंग, संवाद व सर्जनशीलता अशा कौशल्यांनाही महत्त्व देणारी व्यवस्था लिडो लर्निंगच्या माध्यातून निर्माण करण्यात येणार आहे.

- Advertisement -

विद्यार्थ्यांसाठी गणित व विज्ञान असे विषय क्लिष्ट वाटू शकतात. त्यांना जवळच्या वाटणार्‍या भाषेमध्ये शिक्षण दिल्यास त्यांना शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये गुंतवता येईल. विद्यार्थ्याला शिकताना आरामदायी वाटले पाहिजे आणि विविध भाषांमध्ये शैक्षणिक साहित्य उपलब्ध असले पाहिजे, या विचाराने आम्हाला हिंग्लिश कण्टेण्ट तयार करण्याचा निर्णय घेतला.
– साहिल शेठ, संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी, लिंडा लर्निंग

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -