घरमुंबईबाळासाहेबांच्या स्मारकासाठी महापौर बंगला सोडणार

बाळासाहेबांच्या स्मारकासाठी महापौर बंगला सोडणार

Subscribe

महापौर बंगल्यात बुधवारी महापौर, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्यात बैठक झाली. या बैठकीनंतर महापौरांनी बंगला सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी अधिकृतरित्या महापौर बंगल्याचा ताबा सोडणार आहेत. महापौरांनी अखेर भायखळ्यातील वीर जिजामाता उद्यान म्हणजेच राणीच्या बागेतील बंगल्यात जाण्याचा निर्णय घेतला आहे. महापौर बंगल्यात बुधवारी महापौर, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्यात बैठक झाली. या बैठकीनंतर महापौरांनी बंगला सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याप्रमाणे लवरकच महापौर शिवाजीपार्क येथील महापौर बंगला सोडणारआहेत. त्यामुळे आता याठिकाणी लवकरच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारलं जाणार आहे.

म्हणून महापौर बंगला खाली केला

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी शिवाजी पार्क येथील महापौर बंगल्याची जागा देण्यात येणार आहे. येत्या काळात बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम देखील होणार आहे. यासंदर्भात महापौर महाडेश्वरांनी सांगितले आहे की, महापौर बंगल्यात लवकरच बाळासाहेबांचे स्मारक होईल. त्यामुळे मी राणीच्या बागेतील सरकारी निवासस्थानी राहायला जातोय. मी बाळासाहेब ठाकरेंच्या भूमिपूजन सोहळ्याआधीच महापौर निवास खाली केले आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक आता महापौर बंगल्याऐवजी बंगल्याच्या तळघरात होणार आहे.

- Advertisement -

ऐतिहासिक वास्तूची तोडफोड होणार नाही

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी महापौर बंगला ही ऐतिहासिक वास्तू असलेल्या या बंगल्याची कुठलीही तोडफोड तसंच येथील झाडांचीही कत्तल होणार नसल्याचे महापौर महाडेश्वर यांनी सांगितले आहे. या महापौर बंगल्याला ऐतिहासिक वारसा असून पुरातत्त्व विभागाकडून ‘ब’ दर्जा मिळालेला आहे. त्यामुळेच या वास्तूचे जतन करून त्याचे पर्यटनात रुपांतर होईल. शिवाजी पार्कातल्या महापौर बंगल्याच्या ठिकाणी बाळासाहेबांचे स्मारक व्हावे असा प्रसाव नोव्हेंबर २०१६ मध्ये ठेवण्यात आला होता. त्यानंतर फेब्रुवारी २०१७ मध्ये या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -