घरमुंबई‘पॅकेट उठाओ...और कानून बचाओ’ औषध वितरकांचा नवा उपक्रम

‘पॅकेट उठाओ…और कानून बचाओ’ औषध वितरकांचा नवा उपक्रम

Subscribe

औषध वितरक जमवणार रस्त्यावरील गुटख्याची पाकिटं

राज्यभरात गुटखा, पानमसाला या तंबाखूजन्य पदार्थांवर जरी बंदी घातली असली तरी आजही अवैधपद्धतीने हे पदार्थ विकले जातात. आता या पदार्थांवर आळा घालण्यासाठी औषध वितरक पुढाकार घेणार आहे. यासाठी मुंबईसह राज्यभरात ‘पॅकेट उठाओ…और कानून बचाओ’ हा नवा उपक्रम राबवला जाणार आहे. या उपक्रमाअंतर्गत औषध वितरक रस्त्यावरील गुटख्याची पाकिटं जमवणार आहेत.

गुटख्याची सर्रास सुरू असलेल्या विक्रीकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी ‘फुड अँण्ड ड्रग्ज लायसन्स होल्डर असोसिएशन’ने हा निर्णय घेतला आहे. येत्या २ ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंती निमित्ताने हा उपक्रम राबवला जाणार आहे.

- Advertisement -

याविषयी अधिक माहिती देताना फुड अँण्ड ड्रग्ज लायसन्स होल्डर असोसिएशन’चे अध्यक्ष अभय पांडे यांनी सांगितलं की, ‘‘ गुटख्याच्या विक्रीवर राज्यात बंदी असूनही अवैधपद्धतीने याची विक्री सुरू आहे. याकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी औषध वितरकांनी एकत्रित येत ‘पॅकेट उठाओ…और कानून बचाओ’ हा नवा उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी औषध वितरक रस्त्यावर फिरून गुटख्याची पॅकेट्स जमा करतील. हे सर्व पॅकेट्ची फ्रेम करून एफडीए आयुक्तांना देण्यात येणार आहे. गुटखा आणि पानमसाला विक्रीवर तातडीने ठोस पाऊलं उचलावी हा मुख्य उद्देश आहे.’’

‘एफडीए’ च्या अन्न विभागाचे सह-आयुक्त शैलेश आढाव यांनी सांगितलं की, ‘‘ महाराष्ट्रात गुटखा विक्रीवर बंदी असल्याने शेजारील राज्य म्हणजेच गुजरात, आंध्र प्रदेशमधून महाराष्ट्रात बेकायदा गुटखा आणला जातो. यावर एफडीएकडून वारंवार कारवाई केली जातेय. त्यानुसार, २०१३ ते २०१९ या सहा वर्षांच्या कालावधीत तब्बल १८२ कोटींचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. तर, मुंबईतून साधारणतः १ कोटी २४ लाख ११ हजार ३२५ रुपये किंमतीचा गुटखा जप्त करण्यात आला होता. अशा बऱ्याच कारवाया केल्या जातात पण, आणखी ही मोहिम तीव्र करणं गरजेचं आहे.’’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -