घरमुंबईमराठा आरक्षणावर उद्या मंत्रिमंडळाची बैठक; अंतिम निर्णयाबाबत होणार चर्चा

मराठा आरक्षणावर उद्या मंत्रिमंडळाची बैठक; अंतिम निर्णयाबाबत होणार चर्चा

Subscribe

सुप्रीम कोर्टाने शिक्षण आणि शासकीय नोकरीतील मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती दिल्याच्या पार्श्वभूमीवर उद्या, शुक्रवारी महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत अंतिम निर्णय घेण्यापूर्वी मराठा समाजातील विविध संघटनांचे प्रतिनिघी, आरक्षणाच्या बाजूने लढलेली वकील मंडळी, अभ्यासक आणि जाणकारांशी चर्चा होणार असल्याची माहिती समोर येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज, गुरूवारी मराठा आरक्षणासंदर्भात बैठक झाली. बैठकीत सुप्रीम कोर्टाच्या अंतरिम आदेशावर चर्चा झाली. पुढील रणनितीसंदर्भात उपलब्ध कायदेशीर पर्यायांवर विचारविनिमय करण्यात आला असल्याचे समजते.

या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, सदस्य बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे, दिलीप वळसे पाटील, विजय वडेट्टीवार, संसदीय कामकाज मंत्री अनिल परब, राज्याचे महाधिवक्ता, विधी विभागाचे सचिव आदी उपस्थित होते.

- Advertisement -

मराठा समाजाने संतापून कायदा हातात घ्यावा आणि त्याचा राजकीय वापर करता यावा तसेच सर्वोच्च न्यायालयात मराठा समाजाची चुकीची प्रतिमा निर्माण करता यावी, या हेतूने हे कारस्थान केले जात आहे.
– अशोक चव्हाण, अध्यक्ष, मंत्रिमंडळ उपसमिती

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या संदर्भातील मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मराठा समाजाला संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. सुप्रीम कोर्टाचा आदेश अंतरिम आहे आणि त्यासंदर्भात राज्य सरकार योग्य ती पुढील कार्यवाही करणार आहे. त्यामुळे कोणीही निराश होऊ नये आणि कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नये, अशी विनंती त्यांनी केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

जमिनीतून सोने काढण्याच्या बहाण्याने भोंदू बाबाकडून एक लाखांना गंडा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -