घरमुंबईमातोश्रीवरील बैठक राजकीय नव्हती - पंकजा मुंडे

मातोश्रीवरील बैठक राजकीय नव्हती – पंकजा मुंडे

Subscribe

आगामी लोकसभा निवडणूकीत जालन्याच्या जागेवरुन निवडणुक लढवण्याबाबत, आज मातोश्री येथे अर्जून खोतकर आणि उद्धव ठाकरे यांच्यात बैठक झाली. या बैठकीला पंकजा मुंडेदेखील उपस्थित होत्या. बैठक संपवून बाहेर पडल्यावर माध्यमांशी बोलताना म्हणाल्या, की ‘उद्धव ठाकरे यांच्यासोबतची ही भेट ही राजकीय भेट नव्हती. आमचे चांगले संबंध आहेत. मी त्यांचा आशीर्वाद घ्यायला येथे आले होते. त्यांना मी सभांच्या संदर्भात निमंत्रण दिले आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन आता निघाले.’ ‘ही बैठक जालना संदर्भातील नसून, आज सीट्स घोषित झाल्यावर कळेल कोणत्या जागांवर कोण आहे ते कळेल’, असं पंकजा यावेळी म्हणाल्या. पंकजा मुंडे या भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांमधील समन्वयक आहेत.

दरम्यान, पंकजा यांच्यापाठोपाठ काही वेळानेच अर्जुन खोतकरही मातोश्रीवरुन बाहेर आले. ‘मी जालनातून लढण्याचा प्रस्ताव पक्षप्रमुखांना दिला आहे’, अशी प्रतिक्रिया त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. त्यामुळे मातोश्रीवरील आजच्या बैठकीतून काहीच ठोस तोडगा निघाला नसून, जालना प्रश्न आणखी चिघळला आहे, असंच म्हणावं लागेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -