घरमुंबईमध्य-पश्चिम रेल्वेवर मेगा ब्लॉक

मध्य-पश्चिम रेल्वेवर मेगा ब्लॉक

Subscribe

रविवारी पश्चिम व मध्य रेल्वे मेगा ब्लॉक घेणार आहे. पश्चिम रेल्वेवर सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत हा मेगा ब्लॉक बोरिवली ते भायंदर रेल्वे स्थानकादरम्यान आहे. या दरम्यान अप दिशाची सर्व जलद लोकल सेवा विरार-वसई रोडपासून ते बोरिवलीपर्यंत चालविण्यात येणार आहे. तर अप दिशाची सर्व धीम्या मार्गाची लोकल सेवा आणि डाऊन दिशाच्या सर्व जलद लोकल सेवाही बोरिवलीपासून ते विरार- वसई रोड पर्यंतच्या डाऊन दिशांच्या धीम्या मार्गावर चालविण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर सीएसएमटी स्थानकांवरून सुटणार्‍या सकाळी 8.49 ते दुपारी 5.48 वाजेपर्यंत सर्व लोकल सेवा धीम्या मार्गवर चालविण्यात येणार आहेत. तर भायखळा ते माटुंगा स्थानका दरम्यान सर्व लोकल सेवाही जलद मार्गवर धावतील. त्यामुळे प्रवाशांनी चिंचपोकळी आणि करी रोड वरच्या प्रवाशांनी परेल रेल्वे स्थानकावरून प्रवास करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या पॉवर ब्लॉकमुळे पुणे-मुंबई-पुणे सिंहगड एक्सप्रेस, मनमाड-मुंबई-मनमाड राज्यरानी एक्सप्रेस, मनमाड-मुंबई-मनमाड पंचवटी एक्सप्रेस आणि पुणे-मुंबई-पुणे डेक्कन क्वीन एक्सप्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -