घरताज्या घडामोडीआज रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक

आज रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक

Subscribe

पश्चिम रेल्वे मार्गावर जंबो मेगाब्लॉक तर मध्य आणि हार्बर मार्गावरील काही लोकल रद्द करण्यात येणार आहे.

रेल्वेच्या तिन्ही मार्गावर आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर जंबो मेगब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम मार्गावर भाईंदर ते वसईरोड सकाळी ११ ते ३ वाजेपर्यंत या स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर जंबो मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हा मेगाब्लॉक यंत्रणांच्या दुरुस्तीसाठी घेण्यात येणार आहे. याशिवाय मध्य रेल्वे मार्गावरील भायखळा-विद्याविहार तसंच हार्बर मार्गावर देखील मेगाब्लॉकदरम्यान काही लोकल रद्द करण्यात येणार असून यामुळे लोकल सुमारे १५ ते २० मिनिटे उशीराने धावणार आहे.

सकाळी १०:४२ ते दुपारी ३:४४ वाजेपर्यंत मध्य रेल्वेचा धीम्या मार्गावर हा मेगाब्लॉक असणार आहे. यादरम्यान कल्याण दिशेकडे जाणाऱ्या धीम्या लोकल भायखळा ते विद्याविहार स्थानकांदरम्यान जलद मार्गावरून धावणार असून चिंचपोकळी आणि करीरोड येथे या लोकल थांबणार नाहीत.

- Advertisement -

हार्बर रेल्वेच्या मार्गावरील सकाळी १०:३४ ते दुपारी ३:१० वाजेपर्यंत सीएसएमटीहून वाशी/बेलापूर पनवेलकडे जाणारी लोकल रद्द करण्यात येतील. तर सकाळी १०:२१ ते दुपारी ३ वाजेपर्यंत पनवेलहून सीएसएमटीकडे एकही लोकल धावणार नाही. तसंच सीएसटी कुर्ला आणि वाशी-पनवेल यादरम्यान विशेष लोकल धावतील.


हेही वाचा – जलवाहिनी दुरुस्तीचे काम पूर्ण, रविवारपासून पाणीपुरवठा सुरळीत

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -