घोडबंदर येथे मेट्रो रेल्वे पोलवर मनोरुग्ण चढल्यामुळे एकच खळबळ

Thane
mental imbalance patients climb on metro poll in ghodbunder
मनोरुग्ण मेट्रो पुलावर चढल्यामुळे खळबळ

ठाणे रेल्वे स्थानकातील हायटेंशन रेल्वेच्या विद्युत पुलावर चढून एका मनोरुग्णाने शोल स्टाईल आंदोलन करीत खळबळ उडवून दिली होती. या घटनेला महिना उलटला नाही तोच पुन्हा घोडबंदर रोडवर मेट्रो रेल्वेच्या पोलवर चढून मनोरुग्णाने शनिवारी पहाटे खळबळ उडवून दिली. मनोरुग्णांच्या या प्रतापाने पोलीस अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन जवानांना कामाला लावले. शनिवारी पहाटे ५-३० वाजण्याच्या सुमारास मनोरुग्ण बाळू विश्वनाथ चव्हाण (३५) यांची मनस्थिती बिघडल्याने त्यांनी हा प्रकार केल्याचे समोर आले आहे. घोडबंदर रोडवरील सुरज प्लाझा आनंद नगर परिसरात मेट्रो रेल्वेचे काम सुरु आहे. याठिकाणी मेट्रो रेल्वे पोलवर चव्हाण यांनी चढल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच पालिका आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दल हे रेस्क्यू व्हॅन घेऊन पोहचले. त्यांनी मनोरुग्णाला समजवून त्याला सुरक्षित खाली उतरविले आहे.