घरमुंबईवाढीव वीज देयकांबाबत ‘अदानी’ला मागितले २४ तासात स्पष्टीकरण

वाढीव वीज देयकांबाबत ‘अदानी’ला मागितले २४ तासात स्पष्टीकरण

Subscribe

नियमानुसार ठरवून दिलेल्या दरापेक्षा वाढीव दराने विद्युत देयके आकारणीबाबत तक्रारींच्या अनुषंगाने २४ तासात स्पष्टीकरण करावे, असे निर्देश महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने अदानीला दिले आहेत.

नियमानुसार ठरवून दिलेल्या दरापेक्षा वाढीव दराने विद्युत देयके आकारणीबाबत तक्रारींच्या अनुषंगाने २४ तासात स्पष्टीकरण करावे, असे निर्देश महाराष्ट्र विद्युत नियामक (एमईआरसी) आयोगाने अदानी इलेक्ट्रिसीटी मुंबई लि. ला दिले आहेत. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने अदानी इलेक्ट्रिसीटी कंपनी वीज पुरवठा करत असलेल्या क्षेत्रामध्ये १ सप्टेंबर २०१८ पासून वीज दरात सुधारणा केली आहे. त्यानुसार सरासरी ०.२४ टक्के इतकी वीज दरवाढ मंजूर करण्यात आली आहे.

वाचा : अदाणी वाढीव वीजबिल प्रकरणाची होणार चौकशी

- Advertisement -

नियमित दरापेक्षा वाढीव दर 

अदानी इलेक्ट्रिसीटीने नियमित दरापेक्षा खूप जास्त रकमेची वीज देयके ग्राहकांना पाठविल्याबाबत वृत्तपत्रे आणि प्रसारमाध्यमांमध्ये बातम्या प्रसिद्ध होत आहेत. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने (एमईआरसी) या वृत्तांची गंभीर दखल घेतली आहे. मीटर नोंदीनुसार देयके पाठविण्याऐवजी सरासरी देयके पाठविल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी आल्या असून त्यामुळे असंतोष निर्माण होत आहे. याबाबतची वस्तुस्थिती आणि आणि हाती घेतलेल्या उपाययोजनांच्या अनुषंगाने २४ तासाच्या आत स्पष्टीकरण करावे, असे निर्देश महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने दिले आहेत.

वाचा : मुंबईतील वीज ग्राहकांच्‍या प्रश्‍नी; सरकार एमईआरसीकडे जाणार

- Advertisement -

मुख्यमंत्र्यांनीही घेतली होती दखल 

यापूर्वी अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेडने उपनगरातील मुंबईकरांना दिलेल्या वाढीव बिलाच्या प्रकरणात स्वतः मुख्यमंत्र्यांनी लक्ष दिले होते. वाढीव वीज बिलासंदर्भात नागरिकांच्या आलेल्या तक्रारींची दखल घेऊन मुंख्यमंत्र्यांनी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना चौकशी करण्याचे आदेश दिले. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी वीजमीटर रिडिंगच्या घोळाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून वीज ग्राहकांची कैफियत मांडली. मुंबई उपनगरातील ग्राहकांच्या वीजबिलाच्या प्रकरणी समितीची नेमणूक करून राज्याच्या वैधमापन विभागाकडून ऑडिट करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली. चुकीच्या मीटर रिडिंग पाठवून अदानीने कोट्यवधी रुपयांची वसूली केल्याचे आशीष शेलार यांनी आपल्या पत्रात नमूद केले. वीज बिलात ५० ते १०० टक्के इतकी वाढ झाल्याच्या तक्रारी नागरिकांनी येत आहेत. सरासरी वीजबिल देण्याचे प्रकार तीन महिन्यांपासून होत असल्याचेही शेलार यांनी पत्रात नमुद केले होते.

वाचा : रात्री हरियाणातून, दिवसा महाराष्ट्रातून विजेची देवाण-घेवाण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -