घरमुंबईकल्याण डोंबिवली महापालिकेच्या महासभेत राडा

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महासभेत राडा

Subscribe

नगरसेवकांची अटकपूर्व जामिनीसाठी धावपळ,  ३४ समर्थकांवर गुन्हा : २४ जणांना अटक

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महासभेत शिवसेनेच्या नगरसेवकांना आपआपसातील वाद चांगलाच भोवला आहे. शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे आणि दीपेश म्हात्रे त्यांच्यासह त्यांच्या ३४ समर्थकांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी २४ समर्थकांना अटक करून, कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १४ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. उर्वरितांना लवकरच अटक करण्यात येईल असे विष्णुनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मुणगेकर यांनी सांगितले. मात्र अटकपूर्व जामिनीसाठी दोन्ही नगरसेवकांची धावपळ सुरू आहे.

- Advertisement -

डोंबिवली पश्चिमेतील बहुचर्चित मोठागाव ठाकुर्ली येथे बांधण्यात येणार्‍या उड्डाणपुलाच्या मुद्द्यावरून शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे आणि दीपेश म्हात्रे यांच्यात सोमवारच्या महासभेत शाब्दीक वाद झाला होता. यावेळी प्रेक्षक गॅलरीत बसलेल्या दोन्ही नगरसेवकांच्या बॉडीगार्ड समर्थकांनी थेट सभागृहाकडे घुसण्याचा प्रयत्न केला होता. समर्थकांकडे शिवीगाळ आणि हाणामारीचा प्रकार घडला होता. त्यामुळे खूपच गोंधळ झाला होता. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मल्लीनाथ डोके यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी नगरसेवक दीपेश म्हात्रे आणि रमेश म्हात्रे यांच्यासह ३४ जणांच्याविरोधात गुन्हा दाखल करून २४ जणांना अटक केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -