घरमुंबईकागदी मखरातून गड किल्ले संवर्धनाचा संदेश

कागदी मखरातून गड किल्ले संवर्धनाचा संदेश

Subscribe

पर्यावरण पूरक कागदी मखर बनवणाऱ्या नानासाहेब शेंडकर यांनी आता मखरातून देखील गड किल्ले संर्वधानाचा संदेश दिला आहे. हाच गडकिल्ले संवर्धानाचा संदेश देण्यासाठी त्यांनी गडकिल्ल्यांची प्रतिकृती असलेले छोटे-मोठे मखर बनवले आहेत. या मखरांना आता मुंबईकर देखील पसंती देत आहेत.

लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघा आठवडा राहिला असून, आता सगळ्यांची लगभग पहायला मिळत आहे. बाजारपेठा देखील विविध प्रकारच्या साहित्यांनी तसेच विवध प्रकारच्या मखरांनी सजल्या आहेत. मात्र पर्यावरण पूरक कागदी मखर बनवणाऱ्या नानासाहेब शेंडकर यांनी आता मखरातून देखील गड किल्ले संर्वधानाचा संदेश दिला आहे. हाच गडकिल्ले संवर्धानाचा संदेश देण्यासाठी त्यांनी गडकिल्ल्यांची प्रतिकृती असलेले छोटे-मोठे मखर बनवले आहेत. या मखरांना आता मुंबईकर देखील पसंती देत आहेत. राज्यातील गड किल्ल्याची अवस्था बघता त्याचे संवर्धन व्हावे यासाठी नाना शेंडकर आपल्या कलेच्या माध्यमातून पुढाकार घेत आहेत. दिवाळीमध्ये त्यांनी किल्ल्यांचे कंदील तर आता चक्क गड किल्ल्याचे मखर बनवले आहे. नान शेंडकर यांनी गड किल्ल्यांच्या विविध २५ प्रतिकृती बनवल्या असून, यामध्ये छोट्या आणि मोठ्या मखरांचा समावेश आहे. यामध्ये सिंधुदुर्ग किल्ला, रायगड किल्ला याचा समावेश आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे यामध्ये सार्वजनिक आणि घरगुती मखरांचा समावेश आहे. सार्वजनिक मोठ्या गणपतीसाठी एकूण सहा विविध डिझाईन बसवल्या असून, सार्वजनिक मंडळासाठी एकूण १०० गडकिल्ले बनवले आहेत. तर घरगुती गणपतीसाठी छोटे २०० मखर बनवले आहेत. हे मखर बनवण्यासाठी तब्बल २ महिने लागले असून, १५० हून अधिक कारागिर लागले.

अशी आहे कागदी मखरांची किंमत

१२ बाय १२ च्या स्टेज साठी – १९,००० रुपये

- Advertisement -

४० फूट स्टेजसाठी – ९०,००० रुपये

घरगुती छोटे मखर – २५० ते ४५०० रुपये

- Advertisement -

सार्वजनिक इतर मखर – ९००० ते ९०,००० रुपये

‘या’ कागदी मखरांना मुंबईकरांची पसंती

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे नानासाहेब शेंडकर यांनी गड किल्ल्यांसोबतच जयपूर पॅलेस, सिद्धिविनायक जयपूर पॅलेस याच्या देखील प्रतिकृती साकारल्या असून, मुंबईकर या मखरांना पसंती देत असून, हे मखर कागदी असल्याने ते पर्यावरण पुरक देखील आहेत. तसेच हे मखर नेण्यासाठी सोयीस्कर असल्याने तसेच हे मखर पुढच्या वर्षी देखील वापरता येऊ शकतात असे शेंडकर यांनी सांगितले.

मी गेली अनेक वर्षे कागदी मखर, कंदील बनवत असून, मी यावर्षी गड किल्ल्यांचे संवर्धन करणारे मखर बनवले असून, याला लोकांची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. तसेच मागील वर्षाचे देखील दर कायम ठेवल्याने मुंबईकर मोठ्या संख्येने येत आहेत.
नानासाहेब शेंडकर, मखर विक्रेते
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -