घरमुंबई#MeToo सुभाष घईविरोधात केट शर्माने केली तक्रार दाखल

#MeToo सुभाष घईविरोधात केट शर्माने केली तक्रार दाखल

Subscribe

चित्रपट दिग्दर्शक सुभाष घईविरोधात अभिनेत्री केट शर्माने तक्रार दाखल केली आहे. मात्र सुभाष घईने त्यांच्यावर झालेल्या आरोपाचे खंडन केले आहे.

मीटू मोहिमेअंतर्गत बॉलिवूडमध्ये लैंगिक शोषणाचे अनेक धक्कादायक प्रकरण समोर येत आहेत. यामध्येच आता अभिनेत्री केट शर्माने दिगदर्शक सुभाष घई यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. याप्रकरणी तिने घईविरोधात तक्रार दाखल केली आहे. याआधी याप्रकरणात नाना पाटेकरपासून ते साजिद खानपर्यंत अनेक बॉलिवूडच्या प्रसिध्द अभिनेत्यांवर लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले आहेत.

- Advertisement -

सुभाष घईने जबरदस्ती किस केले

केट शर्माने आरोप केला आहे की, ऑगस्टमध्ये सुभाष घईने आपल्या जवळ बोलावले आणि मसाज करण्यास सांगितले. त्यावेळी त्याठिकाणी ५ ते ६ जण उपस्थित होते. मी त्यांची मसाज केली आणि हात धुण्यासाठी निघून गेली. त्यावेळी सुभाष घई माझ्या मागे आले आणि त्यांनी मला एका रुममध्ये बोलण्यासाठी बोलावले. त्यावेळी त्यानी मला जबरदस्ती किस करण्याचा प्रयत्न केला. अशी तक्रार केट शर्माने सुभाष घईविरोधात पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.

याआधी एका महिलेने केले होते आरोप

दिग्दर्शक सुभाष घईविरोधात याआधी देखील एका महिलेने आरोप केले होते. या महिलेने सुभाष घईविरोधात केलेल्या आरोपामध्ये असे म्हटले होते की,सुभाष घईने पेयामध्ये गुंगींचे औषध मिसळवले होते. त्यानंतर त्यांनी माझ्यावर लैंगिक अत्याचार केले होते.

- Advertisement -

मीटू फॅशन झाले आहे

सुभाष घईंनी या आरोपांचे खंडन केले आहे. त्यांनी असे सांगितले आहे की, प्रसिध्द लोकांवर असे आरोप करण्याची एक फॅशनच बनली आहे. भाग्य आहे की सगळ्यांना चांगले आणि वाईट वेळ कळते. मला या आंदोलनात माझे नाव जोडले गेल्याने खूप दु:ख झाले. मात्र जे लोकं मला आधीपासून ओळखतात त्यांना माहित आहे की, प्रसिध्दिच्या जगाबाहेर आम्ही कसे राहतो. महिलांचा सन्मान करतो. हाच सन्मान आज विभिन्न दृष्टीकोनातून दिसत आहे.

मानहानीचा दावा ठोकावा

आपल्याविरोधात झालेल्या आरोपासंदर्भात सुभाष घईंनी ट्विट केल आहे. ‘मी निश्चित रुपामध्ये मी टू मोहीमेचे आणि महिला सशक्तीकरणाचा मोठा समर्थक आहे. जर कोणी माझ्या प्रतिष्ठेला नुकसान पोहचवण्याचा प्रयत्न करत असेल तर याचे मला खूप दु:ख झाले आहे. या आरोपाच्याविरोधात जाऊन मानहानीचा दावा ठोकावा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -