घरमुंबईसात महिन्यांनंतर मोनो - मेट्रो धावली

सात महिन्यांनंतर मोनो – मेट्रो धावली

Subscribe

कोरोनाच्या संकटामुळे ठप्प झालेली मेट्रो सेवा आज सकाळपासूनच मुंबईकरांच्या सेवेत आली आहे. तर मोनोरेलच्या सेवेला रविवारपासून सुरूवात झालेली आहे. अनलॉकच्या टप्प्यात मेट्रो मोनोची सेवा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला, पण या सेवांसाठी काही नियम आणि अटींनुसारच प्रवास करता येणार आहे. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमामुळे काही ठराविक प्रवासीसंख्येसह या सेवेसाठी परवानगी देण्यात आली आहे.

 

- Advertisement -

 

- Advertisement -

मुंबईत सकाळी ८.३० ते रात्री ८.३० या कालावधीतच मेट्रो सेवा चालवली जाणार आहे. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमामुळे ३०० ते ३५० जणांनाच मेट्रोने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामध्ये १०० प्रवाशांना बसून प्रवासाची तर १६० प्रवाशांना उभे राहून प्रवास करता येणार आहे. एका डब्यात ६० ते ६५ प्रवाशांनाच प्रवास करता येईल. तर प्रत्येक प्रवाशाला एक सीट सोडूनच बसावे लागेल. तशी व्यवस्थाच मेट्रो प्रशासनाकडून करण्यात आली आहे.

social distancing metro

कोरोनाच्या आधी मेट्रोच्या ४०० फेऱ्या व्हायच्या. गेल्या ६५ महिन्यामध्ये ६० कोटी लोकांनी मेट्रोने प्रवास केला आहे. कोरोनाच्या संकटामुळे मेट्रो सेवा मार्च ते ऑक्टोबर अशी पुर्ण सात महिने बंद होती.

token

टोकन बंद

मेट्रो प्रवासासाठीचे टोकन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात येणार आहे. टोकन एवजी क्यूआर कोड आणि कागदाचे तिकिट देण्यात येणार आहे. स्मार्ट आयडी आणि मोबाईल एपद्वारेही मेट्रोचे तिकिट देण्यात येणार आहे. मुंबईत कोरोनाचे संकट पाहता अवघ्या २०० ट्रिप होत आहेत. कोरोनाच्या नियमानुसारच मेट्रो सेवेच्या प्रत्येक ट्रिपनंतर मेट्रो सॅनिटाईज करण्यात येणार आहे. कोरोना व्हायरसचे संक्रमण जोवर संपत नाही तोवर कोरोनाच्या नियमानुसार सॅनिटायजेशन करण्यात येणार आहे.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -