घरCORONA UPDATEमेट्रो, मोनोरेल सेवा लॉकडाऊननंतरच्या सेवेसाठी सज्ज

मेट्रो, मोनोरेल सेवा लॉकडाऊननंतरच्या सेवेसाठी सज्ज

Subscribe

पण आता मुंबईतील स्थिती पूर्ववत होत असल्यानेच पुन्हा एकदा सार्वजनिक वाहतूकीची सुविधा सुरू होण्याचे संकेत आहेत. मोनो आणि मेट्रो सेवा पुन्हा एकदा सज्ज होत आहेत.

कोरोनाच्या संकटामुळे मुंबईतील सार्वजनिक वाहतुक उपक्रमातील सेवा गेल्या दोन महिन्यांहून अधिक कालावधीसाठी बंद आहे. पण आता मुंबईतील स्थिती पूर्ववत होत असल्यानेच पुन्हा एकदा सार्वजनिक वाहतूकीची सुविधा सुरू होण्याचे संकेत आहेत. मोनो आणि मेट्रो सेवा पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. पण अत्यावश्यक सेवेतीलच कर्मचारी या वाहतूकीच्या साधनातून प्रवास करतील असे अपेक्षित आहे. सध्या जरी अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांना बेस्ट सारख्या माध्यमांचा वापर करता येत आहे. पण आगामी कालावधीत मात्र मोनोरेल आणि बेस्ट उपक्रमाची सेवा सुरू होणे अपेक्षित आहे. त्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि मेट्रो १ या सेवा सुरू करण्यासाठीची तयारी सध्या करत आहे. लॉकडाऊन नंतर या सेवा सुरू होणे अपेक्षित आहे.

मेट्रो १ कडून रेल्वे स्थानकाच्या ठिकाणी तसेच मेट्रोच्या डब्यातही कोविड- १९ च्या अनुषंगाने तयारी करत आहे. म्हणूनच मेट्रो १ मध्ये स्टिकर्स चिटकवण्यात आले आहेत. कोरोनाची खबरदारी म्हणूनच सोशल डिस्टन्सिंग ठेवण्यासाठी ही खबरदारी घेण्यात येत आहे. तसेच सध्याचे प्लास्टिक टोकन देण्याएवजी पेपर तिकिटाचा वापर सुरू करण्यासाठी मेट्रो १ ने पुढाकार घेतला आहे. तर मोनोरेलची सेवा सुरू करण्यासाठी एमएमआरडीएने तयारी सुरू केली आहे. पण राज्य सरकारकडून या सेवा सुरू करण्यासाठी कोणतीही घोषणा झाली नसल्याने अद्यापही या सेवा कधी सुरू होणार याबाबतची स्पष्टता नाही. जेव्हा सरकारकडून या सेवा सुरू करण्यासाठी आदेश येतील तेव्हा आम्ही सेवा सुरू करण्यासाठी सज्ज आहेत असे कळते. जेव्हा सुरू होतील तेव्हा मेट्रोच्या डब्यांमधील प्रवाशांची संख्यादेखील कमी होणार आहे. लॉकडाऊनआधी सरासरी ४०० लोक एका मेट्रोच्या डब्यातून प्रवास करत होते. तर लॉकडाऊननंतर मात्र एका डब्यात १०० प्रवासी बसतील. तर ७५ जणांनाच उभे राहून प्रवास करण्याची मुभा असेल. मुंबईत मान्सूनच्या हजेरीला सुरूवात झाली असल्यानेच आता मेट्रो आणि मोनोरेलकडूनही सध्या मान्सूनपूर्व कामांची पुर्तता करण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -