मेट्रो तीन कामाचा विक्रम

२४ तासांत १२ किलोमीटर टनेलिंग पूर्ण

Mumbai
Metro

अवघ्या २४ तासांमध्ये २४ मीटर टनेलिंगचा नवा विक्रम मुंबई मेट्रो ३ च्या टीमने केला आहे. जवळपास १ मीटर प्रति तास या वेगाने हे टनेलिंगच काम पूर्ण करण्यात आले आहे. प्रकल्पाअंतर्गतच्या पॅकेज दोन अंतर्गत आझाद मैदान ते ग्रँट रोड असा हा टप्पा आहे. एकुण ४.५ किलोमीटरचे टनेल बोरिंगचे काम या पॅकेजअंतर्गत चालणार आहे. वैतरणा एक आणि वैतरणा दोन या टनेल बोरिंग मशीनच्या माध्यमातून हे काम सुरू आहे.

पॅकेज दोन अंतर्गत सीएसटी मेट्रो, काळबादेवी, गिरगाव आणि ग्रँट अशा एकूण ४ स्टेशन्सचा समावेश आहे. आतापर्यंत १.७४ किलोमीटर इतके टनेलिंगचे काम पूर्ण करण्यात आले आहे. या पॅकेजअंतर्गतच्या कामात निर्माण झालेला राडारोडा महापे एमआयडीसी आणि अंबरनाथ येथे विल्हेवाट लावण्यासाठी पाठवण्यात येत आहे. आतापर्यंत २.२७ लाख क्युबिक मीटर इतका राडारोडा निर्माण झालेला आहे.

संपूर्ण शहरात आता १७ टनेल बोरिंग मशीनने पूर्ण क्षमतेने कामाला सुरुवात झालेली आहे. मेट्रो ३ प्रकल्पाअंतर्गत निश्चित केलेल्या डेडलाईननुसारच मेट्रो तीन प्रकल्पाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. आतापर्यंत १२ किलोमीटरचे टनेल बोरिंगचे काम पूर्ण करण्यात आले आहे. एकूण ५२ किलोमीटर अंतरापैकी १२ किलोमीटरच्या अंतरातच टनेलिंगचे काम पूर्ण झाले आहे. उरलेल्या जागा या स्टेशन बांधणीसाठी वापरण्यात येणार आहेत. त्यामुळे २२ टक्के टनेलिंगचे काम करावे लागणार नाही. मेट्रोच्या सगळ्या टीबीएम मशीन पूर्ण कार्यक्षमतेने कार्यरत आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here