घरमुंबईमेट्रोच्या कामाचा चिखलमिश्रित गाळ नाल्यात; पालिकेने बजावली नोटीस

मेट्रोच्या कामाचा चिखलमिश्रित गाळ नाल्यात; पालिकेने बजावली नोटीस

Subscribe

मेट्रो रेल्वेच्या सहार येथील कामाच्या ठिकाणी खोदण्यात येणाऱ्या टनेलच्या कामातील चिखलमिश्रित पाणी सहार-कार्गो येथील नाल्यात सोडले जात आहे. या नाल्यातून हे पाणी मिठी नदीत मिसळले जात आहे. त्यामुळे अनधिकृतपणे चिखलमिश्रित गाळ नाल्यात सोडला जात असल्याने महापालिकेच्या के-पूर्व विभागाच्या वतीने मेट्रो रेल्वेच्या प्रकल्प अधिकाऱ्यांना नोटीस पाठवून संबंधित कंपनीवर कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत.

सहार येथील मेट्रो रेल्वेच्या कामातील चिखल मिश्रित पाणी नाल्यात सोडले जात असल्याची तक्रार वाचडॉग फाऊंडेशनने केली होती. त्याची दखल घेत महापालिकेने मुंबई मेट्रोला नोटीस पाठवली आहे. मुळात बांधकामाचे पाणी नाल्यात सोडण्यास परवानगी दिली जात नाही. इथे तर हे चिखलमिश्रित पाणी थेट या नाल्याद्वारे मिठी नदीत सोडले जात आहे. एका बाजूला पार्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे मिठी नदी स्वच्छ राखण्याचे आवाहन करत आहेत आणि दुसरीकडे मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे पाणी या नाल्यात सोडून नदी प्रदुषित केली जात आहे.
– गॉडफ्रे पिमेंटा, विश्वस्त, वाचडॉग फाऊंडेशन

- Advertisement -

सहार मेट्रो स्टेशनचे काम सध्या सुरू असून हे काम जे. कुमार आणि सीआरटीजी या संयुक्त कंपनीला देण्यात आले आहे. या कंपनीच्या वतीने शांतीनगर येथे भूमिगत रेल्वे स्टेशनचे काम सुरू आहे. मात्र या कामातील चिखलमिश्रित पाणी हे पंपद्वारे बाजूच्या पी अँड टी कॉलनीतील सहार-कार्गो नाल्यात सोडले जात असल्याची बाब वाचडॉग फाऊंडेशनने महापालिकेच्या निदर्शनास आणून दिली होती. या तक्रारींची दखल घेत महापलिका के-पूर्व विभागाच्या देखभाल विभागाच्या सहायक अभियंत्यांच्या स्वाक्षरीने १४ सप्टेंबर रोजी मुंबई मेट्रो रेल्वेच्या प्रकल्प अधिकाऱ्यांना नोटीस जारी केली आहे. फेब्रुवारी २०२० ला मेट्रोने कामाची कल्पना दिली असली तरी प्रत्यक्षात या खोदकामातील गाळ मिश्रित पाणी नाल्यात सोडण्याची कोणतीही परवानगी दिलेली नाही.

महापालिकेने या नोटिसमध्ये या कामातील पाणी नाल्यात सोडले जात असल्याबाबत वारंवार तक्रारी येत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आपण नेमलेला कंत्राटदाराला थेट नाल्यात चिखलमिश्रित पाणी सोडत असल्याचे महापालिका अधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष पाहणीत दिसून आले आहे. त्यामुळे आपण त्यांना समज देत नाल्यात पाणी न सोडण्याची ताकीद द्यावी व संबंधित कंत्राट कंपनीवर कारवाई करावी. तसेच भविष्यात असा प्रकार पुन्हा घडणार नाही, याकडे लक्ष द्यावे, असे या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

चिंताजनक! महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचे बळी; केंद्राची आकडेवारी जारी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -