घरमुंबईम्हाडाच्या मुख्यालयाचा लवकरच कायापालट

म्हाडाच्या मुख्यालयाचा लवकरच कायापालट

Subscribe

सहा महिन्यांत इमारत पुनर्बांधणीला होणार सुरुवात

मुंबईसह राज्यातील अनेक शहरी भागातील तब्बल ७ लाख नागरिकांचे स्वप्न पूर्ण करणार्‍या म्हाडा मुख्यालयाचा कायापालट होणार आहे. मुंबई उपनगरात तब्बल ५० वर्षांपूर्वी उभे राहिलेले पहिले सरकारी कार्यालय अखेर कात टाकणार आहे. येत्या सहा महिन्यांत इमारत नव्याने उभारण्याच्या कामाला सुरुवात होणे अपेक्षित आहे.

म्हाडाच्या गृहनिर्माण भवनासाठी प्राधिकरणाने आर्किटेक्ट कन्सल्टंट नेमण्यासाठी स्वारस्याची निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. म्हाडाकडे २८ कंपन्यांकडून या कामासाठी अर्ज आले होते. त्यापैकी २१ कंपन्यांची निवड म्हाडाकडून पुढच्या टप्प्यासाठी करण्यात आली आहे. नव्या मुख्यालयासाठी आराखडा तयार करण्याच्या निविदा प्रक्रियेत २१ कंपन्यांमध्ये चुरशीची स्पर्धा आहे. या महिन्याअखेरीस ही सल्लागार नेमणूक प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित आहे. जवळपास २२ हजार ५०५ चौरस मीटरचा भूखंड या संपूर्ण गृहनिर्माण भवनासाठी वापरण्यात येणार आहे. आर्किटेक्ट सल्लागाराची निवड झाल्यानंतर सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून म्हाडा प्राधिकरणासमोर सादर करण्यात येईल.

- Advertisement -

त्यानंतर या कामासाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्यात येणार आहे. या सर्व प्रक्रियेत सहा महिन्यांचा कालावधी लागणार आहे, अशी माहिती म्हाडा मुंबई मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपेंद्र सिंह कुशवाह यांनी दिली. जुन्या इमारतीत दुरुस्ती पोटी गेल्या दोन ते तीन वर्षांत ५० कोटी रुपयांचा खर्च झाला आहे, तसेच आगामी कालावधीत आणखी दुरुस्तीच्या कामांच्या प्रस्तावामुळेच संपूर्ण गृहनिर्माण भवन नव्याने बांधण्याचा विचार झाला आहे. नव्या इमारतीचे आयुष्यमान ५० वर्षे असेल असेही त्यांनी सांगितले. या संपूर्ण गृहनिर्माण भवनासाठी १५० कोटी रुपये ते २०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. म्हाडाच्या उपाध्यक्षांनी या कामासाठी आधीच परवानगी दिली आहे.

असे होणार काम
म्हाडाच्या गृहनिर्माण भवनाच्या उभारणीसाठी दोन टप्प्यात काम करण्याचा म्हाडाचा मानस आहे. सध्याच्या इमारतीचे टप्पेनिहाय बांधकाम करता येईल का? म्हाडाच्या मुख्यालयातील मोकळ्या जागेवर तात्पुरती कार्यालयांची रचना करून हे काम करता येईल का? असा एक पर्याय डिझायनिंग करून द्यावे, असे निविदा प्रक्रियेत आर्किटेक्टकडून अपेक्षित आहे, तर दुसर्‍या पर्यायांतर्गत संपूर्ण इमारत जमीनदोस्त करून एकदाच नव्याने इमारतीचे बांधकाम करण्याचे डिझायनिंग म्हाडाला अपेक्षित आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -