म्हाडा लॉटरी: १० डिसेंबरपर्यंत भरा अर्ज

१० डिसेंबरला रात्री १२ वाजेपर्यंत म्हाडाच्या घरांसाठी अर्ज भरता येणार आहेत. त्यानंतर १६ डिसेंबरला सोडत काढली जाईल.

Mumbai
mhada mumbai lottery 2018: official advertisement announced
म्हाडाच्या तब्बल १३८४ घरांसाठी लॉटरी काढण्यात येणार आहे.

‘मुंबईत हक्काचं घर’ असावं असं सर्वसामान्यांचं स्वप्न ‘म्हाडा’च्या माध्यमातून पूर्ण होतं असतं. मुंबईत स्वत:चं घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी म्हाडाने दिवाळीच्या मुहूर्तावर एक आनंदाची बातमी आणली आहे. म्हाडाच्या तब्बल १३८४ घरांसाठी लॉटरी काढण्यात येणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या बहुर्चित लॉटरीच्या सर्वचजण प्रतिक्षेत होते. मात्र, आता ही प्रतिक्षा संपवत म्हाडाने याबाबतची अधिकृत जाहिरात जारी केली आहे. या लॉटरीमधील घरांसाठी सोमवार ५ नोव्हेंबरला (आज) दुपारी २ वाजल्यापासून अर्जनोंदणीची सुरुवात झाली. ही अर्जनोंदणी पूर्णत: ऑनलाईन असणार आहे. येत्या १० डिसेंबर रात्री १२ वाजेपर्यंतच्या कालावधीत हे अर्ज भरता येणार आहेत. त्यानंतर १६ डिसेंबरला सकाळी १० वाजता १३८४ घरांची लॉटरी (सोडत) काढली जाणार आहे. यानिमित्ताने पुन्हा एकदा सर्वसामान्य लोकांचं परवडेल अशा दरात घर घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे. तुम्हीसुद्धा ऑनलाईन अर्ज भरण्यास इच्छुक असाल तर खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी : https://lottery.mhada.gov.in/OnlineApplication/Mumbai/

१३८४ घरांची तपशीलवार वर्गवारी

कुठलं ठिकाण   –  किती घरं

  • अॅण्टॉप हिल, वडाळा – २७८ सदनिका
  • प्रतिक्षा नगर, सायन – ८९ सदनिका
  • गव्हाणपाडा, मुलुंड – २६९ सदनिका
  • पी.एम.जी.पी. मानखुर्द – ३१६ सदनिका
  • सिद्धार्थ नगर, गोरेगाव (प) – २४ सदनिका
  • महावीर नगर, कांदीवली (प) – १७० सदनिका
  • तुंगा, पवई – १०१ सदनिका
  • मुं.इ.दु. आणि पु. मंडळाच्या – ५० सदनिका
  • विकास नियंत्रण विनिमय प्राप्त – १९ सदनिका
  • शहरात विखुरलेल्या – ६८ सदनिका

यंदाच्या वर्षी म्हाडाच्या लॉटरीमध्ये तब्बल ५ कोटी ८० लाखांच्या किंमतीच्या घरांचा समावेश करण्यात आला आहे. ग्रँट रोडमधील कंबाला हिल धवलगिरी भागात उच्च उत्पन्न गटासाठी ५ कोटी ८० लाखांच्या किंमतीची, प्रत्येकी ९६५ चौरस फुटांची दोन घरं आहेत. ही घरं लॉटरीतील सर्वाधिक किंमतीची घरं आहेत. विशेष म्हणजे म्हाडाच्या आतापर्यंतच्या लॉटरीतील ही सर्वात महागडी घरं आहेत.


खुशखबर: दिवाळीच्या मुहूर्तावर मुंबईत पेट्रोल-डिझेल स्वस्त, आजचे दर काय?

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here