घरमुंबईगोरेगावमध्ये म्हाडाचा पहिला एसआरए प्रकल्प

गोरेगावमध्ये म्हाडाचा पहिला एसआरए प्रकल्प

Subscribe

मोतीलाल नगर प्रकल्पात २ हजार घरांची भर

पश्चिम उपनगरामध्ये म्हाडाने हाती घेतलेल्या मोतीलाल नगरच्या मेगा प्रकल्पामध्ये आता २ हजार एसआरएच्या घरांची भर हौसिंग स्टॉकमुळे पडणार आहे. त्यामुळे येत्या काळात उपनगरात ४२ हजार इतक्या मोठ्या प्रमाणात घरांची उपलब्धतता होणार हे आता नक्की झाले आहे. म्हाडाकडून एसआऱए प्रकल्पाच्या घोषणेमुळे हे शक्य होणार आहे. मोतीलाल नगरमधील महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा)कडून हाती घेतलेल्या पुनर्विकासात मुंबईतील पहिल्यांदा एसआरए प्रकल्प साकारण्यात येणार आहे, अशी माहिती म्हाडाच्या मुंबई मंडळाचे सभापती मधू चव्हाण यांनी सांगितले. गोरेगाव येथील मोतीलाल नगर येथे म्हाडाच्या मालकीच्या जागेवर 2 हजार झोपड्या आहेत. या झोपड्यांचा पुनर्विकास म्हाडा स्वत: करणार आहे. मोतीलाल नगर प्रकल्पाअंतर्गत दोन हजार ते अडीच हजाराची विक्रीच्या (सेलेबल) सदनिका म्हाडाला हौसिंग स्टॉक म्हणून उपलब्ध होणार आहे. विकास आराखड्यानुसार इमारतींचा विकास होणार आहे.

हायकोर्टाने दिलेल्या आदेशानुसार, मोतीलाल नगरातील रहिवाशांना जास्तीत जास्त चटईक्षेत्र उपलब्ध करून दिले जाणार आहे. परवडणारी घरे उपलब्ध व्हावीत यासाठी इथे अत्यल्प, अल्प आणि मध्यम गटातील घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. झोपडपट्टीधारकांना 300 चौ. फुटांचे घर दिले जाईल. या 2 हजार झोपड्यांव्यतिरिक्त म्हाडाला अतिरिक्त हौसिंग स्टॉक मिळणार असल्याचे म्हाडा मुंबईचे सभापती मधू चव्हाण यांनी सांगितले. खासगी विकसकांना झोपडपट्टी विकसित करण्यास मनाई केली जाईल, आवश्यकता वाटल्यास विशेषाधिकार वापरत, विकासकाला मोतीलाल नगरमधील झोपडपट्टी विकसित करण्यात मनाईही केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. मोतीलालनगरमधील म्हाडाकडून हाती घेण्यात येणार्‍या पुनर्विकासातून तब्बल 40 हजार घरांचा प्रचंड साठा मुंबईकरांच्या हाती येणार आहे. त्याव्यतिरिक्त आणखी दोन ते अडीच हजार घरे एसआरएतून म्हाडाला उपलब्ध होणार आहेत. म्हाडाने यापूर्वी मोतीलालनगरमधील विस्तीर्ण 142 एकर भूखंडावर पुनर्विकासातून मिनी शहर वसविण्याची योजना जाहीर केली आहे. त्याचाच भाग म्हणून प्रोजेक्ट सल्लागार समितीकडून (पीएमसी) या भागात सर्वेक्षण सुरू झाले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -