घरमुंबईवालधुनी नदी पात्रात एमआयडीसीतील कंपनीचे अतिक्रमण

वालधुनी नदी पात्रात एमआयडीसीतील कंपनीचे अतिक्रमण

Subscribe

वालधुनी नदी पात्रातील बांधकाम थांबविण्याची मागणी एमआयडीसीच्या अभियंत्यांकडे केली आहे.

अंबरनाथच्या वडोल एमआयडीसीतील एका कंपनीने वालधुनी नदी पात्रात अतिक्रमण केल्याचा आरोप मनसेचे अंबरनाथ शहराध्यक्ष कुणाल भोईर यांनी केला. याप्रकरणी कारवाई करून बांधकाम थांबविण्याची मागणी एमआयडीसीच्या अभियंत्यांकडे केली आहे. अंबरनाथ शहरातून वाहणारे नैसर्गिक नाले आणि वालधुनी नदीची आधीच जलप्रदुषणामुळे दुरावस्था होत आहे. नदी संवर्धन आणि नदी बचावसाठी एकीकडे काही संस्था नदी स्वच्छतेसारखे उपक्रम राबवत आहेत. मात्र काही ठिकाणी शहरातून वाहणारे नैसर्गिक नाले आणि वालधुनी नदीच्या पात्रात शासकीय अनास्थेमुळे अतिक्रमणेही वाढत चालली आहेत.

संबंधित बांधकाम तात्काळ थांबवण्याची मागणी

अंबरनाथ येथील वडोल एमआयडीसीतील ब्लू सर्कल कंपनीने कंपनीच्या शेजारी वाहणाऱ्या नैसर्गिक नाल्यात संरक्षक भिंतीचे काम सुरू केले आहे. त्यामुळे पाण्याचा प्रवाह वळला असल्याचा आरोप मनसेचे अंबरनाथ शहराध्यक्ष कुणाल भोईर यांनी केला आहे. पावसाळ्यात अशा पध्दतीने उभारलेल्या अतिक्रमणांमुळे पुराचा धोका उद्भवण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे. याप्रकरणी आपण एमआयडीसीच्या कार्यकारी अभियंत्यांकडे तक्रार केली असून संबंधित बांधकाम तात्काळ थांबवण्याची मागणी केली असल्याचे भोईर यांनी सांगितले.

- Advertisement -

मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा

यासंदर्भात कार्यवाही न झाल्यास मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. याबाबत एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता आर. राठोड यांना विचारले असता याबाबत तक्रार प्राप्त झाली असून, उपअभियंत्यांना याप्रकरणी चौकशी करण्यास सांगितले आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर याप्रकरणी योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.


हेही वाचा – कामगारांच्या पीएफ निधीचा केला अपहार

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -