घरमुंबईकल्याणमधील प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयाचे अखेर डोंबिवलीत स्थलांतर

कल्याणमधील प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयाचे अखेर डोंबिवलीत स्थलांतर

Subscribe

एमआयडीसी परिसरातील वाढत्या प्रदूषणाची दखल घेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कल्याण येथील उपप्रादेशिक कार्यालय डोंबिवलीत स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव ई. रविंद्रन यांनी याविषयीचा आदेश जारी केले आहेत. मनसेचे आमदार राजू पाटील यांनी याप्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे पाठपुरावा केला होता. तसेच काही दिवसांपूर्वीच डोंबिवलीतील प्रदूषणाची दखल घेेऊन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी एमआयडीसीची पाहणी केली होती.

कंपन्यांतून होणारा प्रदूषणाचा थेट परिणाम आजूबाजूच्या रहिवाशांच्या आरोग्यावर होत आहे. याठिकाणी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कार्यालय नसल्याने तज्ज्ञ उपलब्ध होत नाहीत, त्यामुळे डोंबिवलीत प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कार्यालय सुरू करण्याची मागणी स्थानिक आमदार राजू पाटील यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव ई. रविंद्रन यांच्याकडे केली हेाती. केंद्रीय प्रदूषण मंडळाने सन 2017-18 मध्ये देशातील औद्योगिक क्षेत्रांचे सर्वसमावेशक पर्यावरण मूल्यांकन केले असता देशातील 100 औद्योगिक क्षेत्रे प्रदूषित म्हणून आढळून आली त्यात महाराष्ट्रातील 9 औद्योगिक क्षेत्रांचा समावेश आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ डोंबिवली फेज 1 व फेज 2 क्षेत्र यादीमध्ये 40 व्या क्रमांकावर आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कार्यालय डोंबिवलीत स्थलांतरीत होत असलयाने, डोंबिवलीतील प्रदूषण आहे याचा अनुभव प्रदूषण मंडळाच्या अधिकार्‍यांना घेता येणार आहे तसेच डेांबिवलीकरांना तक्रारही करता येणार आहे, त्यामुळे प्रदूषित कंपन्यांवर तातडीने कारवाई होऊ शकते.

मागील लेख
पुढील लेख
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -