मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारीपदी मिलिंद बोरीकर

मुंबई उपनगर जिल्हयाचे जिल्हाधिकारी तसेच जिल्हादंडाधिकारी या पदाचा पदभार मिलिंद बोरीकर (भा.प्र.से) यांनी १८ जुलै २०१९ रोजी स्विकारला आहे.

Mumbai
जिल्हाधिकारीपदी मिलिंद बोरीकर

मुंबई उपनगर जिल्हयाचे जिल्हाधिकारी तसेच जिल्हादंडाधिकारी या पदाचा पदभार मिलिंद बोरीकर (भा.प्र.से) यांनी १८ जुलै २०१९ रोजी स्विकारला आहे. लोकाभिमूख प्रशासनावर त्यांचा भर असणार आहे. नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी विनापरवानगी भेटीची वेळ ही दररोज दुपारी ३ ते ५ अशी ठेवली आहे.

मिलिंद बोरीकर हे २०१ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खासगी सचिव म्हणून ३ वर्ष काम पाहिले आहे. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी, पालघर जिल्हा परिषद या पदावर काम करत असतांना त्यांनी सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून काम पाहिले आहे. पालघर या आदिवासी बहुल जिल्ह्यामध्ये मुलभूत सोयी-सुविधा निर्माण करण्यावर जसे की, शौचालय, शाळा/अंगणवाडी इमारत बांधकाम, पोषण आहार, कुपोषण निर्मुलन, पाणीपुरवठा इत्यादींवर भर दिला होता.

हेही वाचा –

आकाशवाणीच्या ९२ व्या वर्धापन दिना निमित्ताने….

धर्मेंद्र झाले भावूक; म्हणाले, ‘कधी हसून घेतो तर कधी रडून’