घरमुंबईअल्पवयीन मुलीवर अपहरणाचा गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलीवर अपहरणाचा गुन्हा दाखल

Subscribe

लहान मुलाचे अपहरण करून खंडणी मागणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन मुली विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ठाणे जिल्ह्यातील ही घटना असून या घटनेनंतर स्थानिकांना आश्चर्याचा धक्का लागला आहे.

ठाणे पोलिसांनी एका १७ वर्षीय अल्पयीन मुलीला अपहरणाच्या गुन्हा अंतर्गत अटक केली आहे. यामुलीने ११ वर्षीय मुलाचे अपहरण करून सहा लाख रुपयांची मागणी केली होती. खंडणीची रक्कम घेण्यासाठी आल्यावर पोलिसांनी तिला अटक केली आहे. भारतीय दंड संहितेच्या ३३६ अ कलमाअंतर्गत या मुलीला अटक करण्यात आले आहे. ठाणे पोलिसांनी सापळा रचून त्या मुलीला अटक केली आहे. आरोपी मुलीला अटक करून न्यायालया समोर उभे केले आहे.

काय आहे प्रकरण

शांती नगर परिसरात राहणारा निशांत (बदललेलं नाव) हा याच परिसरामध्ये क्लासला जात होता. काल क्लासवरून निशांत घरी आला नाही म्हणून त्याच्या आईला काळजी लागली होती. रात्र झाली तरीही निशांत परत न आल्यामुळे तिने क्लासला फोन लावला. मात्र निशांत क्लासमध्ये नसल्याची माहिती त्याच्या आईला मिळाली. दरम्यान काही वेळाने तिला फोन आला. निशांतचे अपहरण करून सहा लाखांची खंडणी या फोन वरून मागण्यात आली. निशांत हवा असल्यास सहा लाखाची खंडणी भिवंडीतील शिवाजी चौक परिसरात ठेवण्यास सांगण्यात आले. निशांतच्या आईने ही माहिती पोलिसांना दिली.

- Advertisement -

सापळा रचून केलं अटक

पोलीस वरिष्ठ निरिक्षक ममता डिसोझा यांनी दिलेल्या माहिती नुसार, निशांतचे वडिल ठाण्यातील एका ज्वेलरीच्या दुकानात काम करतात. पैशाची मागणी केल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे मदत मागीतली. ठरलेल्या ठिकाणी पैसे घेऊन पोलिसांनी निशांतच्या आईला पाठवले. या ठिकाणी असलेल्या एका दुचाकीजवळ पैसे ठेवण्यात सांगण्यात आले होते. या ठिकाणी पैसे ठेवून काही अंतरावर असलेल्या निशांत घेऊन त्या निघाल्या. काही वेळाने खंडणीचे पैसे घेण्यासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीला पोलिसांनी सापळा रचून पकडले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -