घरताज्या घडामोडीमीरा-भाईंदर पालिकेतील उपायुक्तांना कोरोनाचा संसर्ग

मीरा-भाईंदर पालिकेतील उपायुक्तांना कोरोनाचा संसर्ग

Subscribe

मीरा-भाईंदर महानगरपालिकेचे उपायुक्त संभाजी पानपट्टे यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर आता पालिका आयुक्त डॉ. विजय राठोड यांनी देखील स्वतःला १४ दिवसांकरीता घरातच अलगीकरण केले आहे. दोन आठवड्यांपूर्वीच डॉ. विजय राठोड यांनी पालिकेचा कार्यभार स्वीकारला असताना अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. आरोग्य विभागातील एका कर्मचार्‍याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

मीरा-भाईंदरमध्ये कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. त्यात आता कोरोनाने महानगरपालिकेतही हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. आतापर्यंत मीरा-भाईंदर महानगरपालिकेतील १५ ते १८ अधिकार्‍यांना कोरोनाची लागण झाली आहे, त्यातील काहीजण बरे झाले आहेत. काही कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झालेली आहे त्यात नगररचना विभाग, आरोग्य विभाग व अग्निशमन विभागातील कर्मचार्‍यांना समावेश आहे. महानगरपालिकेचे उपायुक्त संभाजी पानपट्टे यांना कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्यामुळे त्यांनी आपली चाचणी केली.

- Advertisement -

मंगळवारी त्यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्या संपर्कात आलेल्या अधिकार्‍यांनादेखील अलगीकरण करण्याची सूचना आरोग्य विभागाकडून देण्यात आली.अनेक अधिकार्‍यांसह चक्क आयुक्तांवर १४ दिवसांकरिता सक्तीचे अलगीकरण करून घेण्याची वेळ आली आहे. त्यामुळे प्रशासनाच्या कामावर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -