पंतप्रधान नरेंद्र मोदींवर प्रश्न विचारताच Beauty Pageant ची सौंदर्यवती म्हणाली…

मिस कोहिमा 2019 (Miss Nagaland) या स्पर्धेत सेकंड रनर अप ठरलेल्या स्पर्धेत सेकंड रनर अप ठरलेल्या सौंदर्यवतीने दिलेल्या उत्तराची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

Mumbai
miss kohima 2019 second runner up vikuonuo sachu asked question on pm modi

मिस कोहिमा 2019 (Miss Nagaland) या स्पर्धेत सेकंड रनर अप ठरलेल्या सौंदर्यवतीला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विषयी विचारण्यात आलेल्या प्रश्नावर तिने दिलेल्या उत्तराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तिने दिलेल्या उत्तरावर सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

miss kohima 2019 second runner up vikuonuo sachu asked question on pm modi 12

मिस कोहिमा 2019 (Miss Nagaland) या स्पर्धेची सेकंड रनरअप Vikuonuo Sachu हिला शेवटच्या फेरीमध्ये परिक्षकांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर एक प्रश्न विचारला. प्रश्न असा होता की, जर तुला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलण्याची संधी मिळाली तर तू त्यांच्याशी काय बोलशील? यावर उत्तर देताना Vikuonuo Sachu म्हणाली की, “मला जर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली तर मी त्यांना सांगेन की त्यांनी गायींपेक्षा देशातील महिलांच्या परिस्थितीवर जास्त लक्ष केंद्रित करावे.” Vikuonuo Sachu च्या उत्तराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे.

miss kohima 2019 second runner up vikuonuo sachu asked question on pm modi 13

नुकत्याच पार पडलेल्या मिस कोहिमा ब्यूची पिजेंट २०१९ ची सेकंड रनर अप ठरलेली १८ वर्षीय Vikuonuo Sachu ही महाविद्यालयीन विद्यार्थिनी आहे. २३ वर्षीय Khrienuo Liezietsu नं मिस कोहिमा २०१९ चा किताब जिंकला.