घरमुंबईमिशन दादर रेल्वे पोलीस; दीड महिन्यात ८८ गुन्हे उघडकीस 

मिशन दादर रेल्वे पोलीस; दीड महिन्यात ८८ गुन्हे उघडकीस 

Subscribe

मुंबईच्या धकाधकीच्या जीवनात दररोज अनेक गुन्हे घडत असतात. या गुन्ह्यांची उकल करण्यासाठी पोलीस कंबर कसून काम करतात. मुंबईतील महत्त्वाच्या आणि मोठ्या समजल्या जाणार्‍या रेल्वे स्टेशन्सवर गर्दीचा फायदा घेत गुन्हेगार चोर्‍या आणि लुटमार करतात.

मुंबईच्या धकाधकीच्या जीवनात दररोज अनेक गुन्हे घडत असतात. या गुन्ह्यांची उकल करण्यासाठी पोलीस कंबर कसून काम करतात. मुंबईतील महत्त्वाच्या आणि मोठ्या समजल्या जाणार्‍या रेल्वे स्टेशन्सवर गर्दीचा फायदा घेत गुन्हेगार चोर्‍या आणि लुटमार करतात. अशा गुन्हेगारांवर वचक ठेवता यावा आणि त्यांच्या मनात भीती निर्माण व्हावी, यासाठी मध्य रेल्वेच्या दादर रेल्वे स्थानकातील रेल्वे पोलिसांनी एक वेगळी आणि अनोखी मोहीम हाती घेतली आहे. ‘मिशन पोलीस व्हिसीबीलिटी’ या नावाने ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी दादर मध्य रेल्वेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी आरपीएफ आणि जीआरपीएफ यांना एकत्रित आणत टीम बनवली.

दादर स्थानकात आरपीएफ आणि जीआरपीएफ यांची एक शस्त्रधारी टीम तैनात करण्यात आली असून या टीमचे प्रतिनिधित्व स्वतः दादर रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे करत आहेत. सकाळी 7 ते 9, दुपारी 12 ते 2 आणि संध्याकाळी 5 ते 7 या कालावधीत ही टीम दादरच्या मध्य रेल्वे स्थानकात स्वतः गस्त घालते आणि संशयितांचा माग घेते.

- Advertisement -

गेल्या दोन महिन्यापूर्वीच प्रसाद पांढरे यांची दादरच्या रेल्वे पोलीस ठाण्यात बदली झाली. ते रुजू झाल्यापासून दादर स्थानकात होणार्‍या गुन्ह्यांना चाप बसला आहे. आरपीएफ आणि जीआरपीएफ यांना एकत्र करून त्यांनी राबवलेली ही पहिलीच योजना आहे. याचा फायदा लोकांच्या मनात पोलिसांविषयी विश्वास निर्माण करण्यासाठी होतो, असे पांढरे म्हणतात. सकाळपासून तीनवेळा दादर स्थानकात पोलिसांच्या गस्तीमुळे आरोपींवर वचक बसला आहे. सर्वसामान्य माणसांच्या मनात रेल्वे स्थानकात आता चोरट्यांची भीती वाटत नाही. गुन्हेगारांविरोधी आरपीएफ आणि जीआरपीएफ  एकत्रित काम करतात तेव्हा यश हे मिळते. या मिशनमुळे दादर स्थानकात घडणार्‍या गुन्ह्यात घट झाल्याचे निदर्शनास आले आहे.

गेल्या दीड महिन्यांपासून आतापर्यंत 88 गुन्ह्यांची उकल करण्यात दादर रेल्वे पोलीस यशस्वी झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून दादरच्या ठाण्यात रुजू असलेल्या सर्व शिपायांचे वाढदिवस आम्ही साजरे करतो. यामुळे शिपायांना हुरूप येतो. परिणामी ते अधिक जोमाने काम करतात. मागची सरासरी पाहता महिन्याला फक्त 15 ते 20 गुन्ह्याची उकल होत होती. मात्र वाढदिवस साजरा करण्याची सुरुवात झाल्यापासून आमच्या पोलीस ठाण्यात सर्वाधिक काम झाले आहे.
-प्रसाद पांढरे ,वरिष्ठ निरीक्षक ठाणे,
दादर रेल्वे पोलीस ठाणे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -